Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

उरण हत्याकांड; ‘माझ्या पोरीला दाऊदनेच मारलं’, हंबरडा फोडत यशश्रीच्या वडिलांचा आरोप

13

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई (उरण) : उरण शहरातील २२ वर्षीय मृत तरुणीची हत्या दाऊद शेख यानेच केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी सोमवारी केला. तर, आरोपीचा शोध सुरू असून, पोलिसांचे एक पथक कर्नाटकच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. यातच, अनेक राजकीय नेत्यांनी सोमवारी दिवसभरात मृत तरुणीच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.मृत तरुणी दुपारी १.३०च्या सुमारास मैत्रिणीच्या घरून निघाली होती. त्यानंतर, शुक्रवारी उरण शहरापासून अवघ्या २०० मीटरवर सिडकोच्या हद्दीतील मैदानाजवळ तिचा मृतदेह आढळला. तिची हत्या गुरुवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आल्याचे शवविच्छेदनात आढळून आल्याने सूत्रांनी सांगितले. त्यामुळे दुपारी २ ते सायंकाळी ५दरम्यान नेमके काय घडले, याचा तपास करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, नवी मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमित काळे आणि त्यांच्या पथकाने सोमवारी दुपारी घटनास्थळाची पाहणी केली.
Mumbai Ganeshotsav: मुंबईतल्या गणेश मंडळांसाठी गुडन्यूज, ‘बाप्पा’च्या मंडपाला परवानग्या लवकरच, कधी सुरु होणार?

ही तरुणी गुरुवारी दुपारी घराबाहेर पडली ती पुन्हा परतलीच नाही. तिची हत्या झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाल्यानंतर उरणमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मागील दोन दिवसांपासून शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. या प्रकरणी निषेध मोर्चा काढून दोन दिवसांत आरोपीला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार श्रीरंग बारणे, सचिन अहिर, आदिती तटकरे यांनी मृत तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. आपल्या मुलीची हत्या संशयित आरोपी दाऊद शेखनेच केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी यावेळी केला. या तरुणीच्या हत्येचा गुन्हा जलदगती न्यायालयात चालवण्याची व संशयित आरोपी दाऊद शेखवर ‘ॲट्रोसिटी’अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे सोमय्या यांनी यावेळी नमूद केले. ‘दाऊद आणि त्याच्या साथीदारांना अटक करून अंतिम शिक्षा होईपर्यंत तुरुंगाबाहेर जाऊ दिले जाणार नाही’, असे वचन तिच्या कुटुंबीयांना देतानाच हे ‘लव्ह जिहाद’चे गंभीर प्रकरण असल्याचे सोमय्या म्हणाले.
Rahul Gandhi: ‘भाजपचा ‘चक्रव्यूह’ आम्ही भेदू’, देशात भीतीचे वातावरण; राहुल गांधी यांचा आरोप

‘लाडकी बहीण असुरक्षित’

‘मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजनेचा गवगवा करणारे सरकार महिलांची सुरक्षा करण्यात अपयशी ठरले आहे. राज्यातील सरकार मजबूत नाही, त्यामुळे कायदा मजबूत नाही. परिणामी महिलांवरील अत्याचाराचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. लाडकी बहीण फक्त पोस्टरवर मर्यादित ठेवणाऱ्या या पोस्टर सरकारच्या कार्यकाळात राज्यात लाडकी बहीण सुरक्षित राहिलेली नाही’, असे टीकास्त्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सोडले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.