Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबै बँकेवर शिंदे सरकारची मेहेरनजर, सहकार भवनासाठी गोरेगावला तीन एकर जागा

11

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या मुंबै बँकेवर राज्य सरकारची मेहेरनजर समोर आली आहे. या बँकेला सहकार भवन उभारण्यासाठी गोरेगाव येथील महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या जागेतील मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयाच्या ठिकाणी तब्बल १२,२५९.०७ चौ.मी. म्हणजेच सुमारे तीन एकर जागा देण्यात येणार आहे.

कृषी, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागातर्फे यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. याचवेळी मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयाच्या परळ आणि गोरेगाव येथील कॅम्पसमध्ये प्रस्तावित विकासकामांसाठी १०० कोटींचे एक रकमी अनुदान देण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे.

गोरेगाव येथील सर्वे क्रमांक १४ ‘ब’मधील १४५ एकर जमीन ही महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या नावे आहे. सध्या या जागेवर मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय कार्यरत आहेत. या जागेतील सुमारे तीन एकर जमीन मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांना सहकार भवन बांधण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी व कोकण विभागीय आयुक्तांनी केली होती. त्यानुसार महसूल विभागाने ही जमीन महसूल व वन विभागास प्रत्यार्पित करण्याची विनंती काही दिवसांपूर्वीच केली होती.
Milind More : धक्का लागल्याने वाद, रिक्षाचालकाची साथीदारांसह मारहाण, ठाकरेंच्या जखमी शिलेदाराचा हार्ट अटॅकने मृत्यू
या प्रस्तावानंतर महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या ७ मार्चच्या कार्यकारी परिषदेच्या विशेष बैठकीत ठराव मांडण्यात आला होता. त्याला परिषदेने मान्यता दिल्यानंतर अखेर ही जमीन प्रत्यार्पित करण्यास सोमवारी शासन निर्णयाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आली.
Chetan Vitthal Tupe: भैया, ‘घड्याळ’ काढलं का? अजित दादांच्या आमदाराने चिन्ह हटवलं, तीन आमदार शरद पवार गटात?

शासन निर्णयानुसार…

– मुंबै बँकेला देण्यात येणाऱ्या जमिनीची चतु:सीमा विद्यापीठाचे कुलसचिव आणि मुंबै बँकेच्या उपस्थितीत व सहमतीने निश्चित करणार
– विद्यापीठाला जमीन वाटप करताना शिक्षण आणि संशोधन उद्देश अनिवार्य केला होता. त्यात बदल करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश

– ही जमीन देताना मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयात सुरू असलेल्या व भविष्यातील शैक्षणिक, संशोधन, विस्तार आणि अभ्यासक्रमेतर उपक्रमांमध्ये अडथळा येणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश
– महाविद्यालय परिसरात सर्व विद्यार्थी व विशेषत: विद्यार्थिनींची सुरक्षा कोणत्याही प्रस्तावित प्रकल्पामुळे धोक्यात येऊ नये, याची दक्षता घेण्याची सूचना
– महाविद्यालयाच्या परिसरातील नवशयाचा पाडा येथील अतिक्रमणावर सुरक्षा भिंत बांधण्यासाठी महाविद्यालयास निधी उपलब्ध करून देण्याची सूचना

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.