Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ऑगस्ट राशीभविष्य २०२४ : श्रावण महिन्यात ४ राशींची चांदी, गुंतवणूक करताना सावध राहा; जोडीदाराशी मतभेद, वाचा ऑगस्ट मासिक राशिभविष्य
Monthly Horoscope August 2024 : ऑगस्ट महिन्यात श्रावण मास सुरु होत असल्यामुळे शंकराची पुढील महिनाभर अनेक राशींवर विशेष कृपा राहिल. या योगात अनेक शुभ संयोग देखील घडून येत आहे. ग्रहांच्या युतीमुळे काही राशींना आर्थिक लाभ होतील तर काहीचे आर्थिक बजेट विस्कटेल. तुमच्या चुकीच्या बोलण्याने काम बिघडेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअरमध्ये आणि व्यवसायात अडथळे येतील परंतु, अपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी वाद घालणे टाळा. हा महिना मार्केटिंग, मालमत्ता आणि कंत्राटाची कामे करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ ठरेल. विद्यार्थ्यांना अभ्यास मनापासून करावा लागेल. कठोर परिश्रम केल्यानंतर अपेक्षित यश मिळेल. तुमची राशी काय सांगते त्यासाठी सविस्तरपणे वाचा राशिभविष्य.
मेष – गुंतवणूक करताना सावध राहा
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला मेष राशीच्या लोकांना बोलण्यावर आणि स्वभावावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तुमच्या चुकीच्या बोलण्याने काम बिघडेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअरमध्ये आणि व्यवसायात अडथळे येतील परंतु, अपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी वाद घालणे टाळा. सहकार्यांशी संवाद साधून काम करणे चांगले राहिल. मित्र नेहमी कठीण प्रसंगात साथ देतील. व्यवसाय करणाऱ्यांना गुंतवणूक करताना सावध राहाणे गरजेचे आहे. अन्यथा आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. शेवटचा आठवडा शुभ ठरेल. नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. करिअर आणि व्यवसायातील प्रवास अपेक्षित यश मिळेल. प्रेमसंबंधांत मोठे बदल होतील. जोडीदारासोबत नातेवाईकांशी चांगले संबंध ठेवा. प्रेमसंबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. नात्यातील गैरसमज दूर करण्यासाठी संवाद साधा. वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करु नका.
वृषभ – व्यवसायात यश मिळेल
वृषभ राशीसाठी ऑगस्ट महिन्याची सुरुवात शुभ असणार आहे. या काळात करिअर आणि व्यवसायाच्या प्रगतीसाठी लांबचा प्रवास करावा लागेल. दीर्घकाळापासून सुरु असलेले अडथळे आज दूर होतील. ध्येय साध्य करण्यासाठी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसायाशी संबंधित लोकांना अपेक्षित लाभ मिळतील. नोकरीत उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत तयार होतील. मार्केटिंग, मालमत्ता आणि कंत्राटाची कामे करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ ठरेल. विद्यार्थ्यांना अभ्यास मनापासून करावा लागेल. कठोर परिश्रम केल्यानंतर अपेक्षित यश मिळेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. व्यवसाय वाढवण्यासाठी महिन्याच्या मध्यात चांगल्या संधी मिळतील. कुटुंबातील मतभेद संपतील. परदेशात नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना शुभ ठरेल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा महिना चांगला असेल. लव्ह पार्टनरसोबतचे प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.
मिथुन – आर्थिक बजेट बिघडेल
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला मिथुन लोकांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील. वडिलोपार्जित मालमत्ता मिळेल. जमीन, वास्तू, वाहन इत्यादींचे सुख मिलेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमभावना वाढेल. जीवनात यश किंवा लाभ मिळवण्यासाठी घाई करु नका. हिचचिंतकांचा किंवा वरिष्ठांचा सल्ला घ्या. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लान कराल. महिन्याच्या मध्यात अडचणींचा सामना करावा लागेल. अचानाक आर्थिक खर्च वाढतील. ज्यामुळे बजेट बिघडू शकते. करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळवण्यासाठी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागेल. आरोग्यासोबत नात्यांची विशेष काळजी घ्या. प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा महिना अतिशय संवेदनशील असेल. प्रेमसंबंधात काळजीपूर्वक विचार करुन निर्णय घ्यावा. तणावातून किंवा भावनेच्या भरात निर्णय घेणे टाळा अन्यथा पश्चाताप करावा लागेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबातील काही गोष्टींमुळे तुमचे मन चिंतेत राहिल. खाण्यापिण्याच्या सवयींवर विशेष लक्ष द्या
कर्क – नात्यात चढ-उतार
कर्क राशीसाठी ऑगस्टचा महिना चांगला असेल. तुम्ही तुमची मते मांडण्यासाठी सक्षम असाल. बुद्धिमत्तेने तुम्ही सर्व अडथळ्यांवर मात करण्यास यशस्वी व्हाल. करिअर आणि व्यवसायात अपेक्षित लाभ मिळतील. नातेवाईकांसोबतचे गैरसमज दूर होतील. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ ठरेल. प्रवास, करिअर आमि व्यवसायात अत्यंत यशस्वी ठरतील. महिन्याच्या मध्यात अचानक मोठ्या खर्चांना सामोरे जावे लागेल. मालमत्तेसंबंधित वादात कोर्टात फेऱ्या माराव्या लागतील. या काळात पैसे उधार घ्यावे लागतील. स्वत:ची कामे दुसऱ्याच्या हातात देऊ नका. आरोग्यासाठी हा काळ चांगला नसेल. जुने आजार पुन्हा नव्याने वर येतील. या काळात कुटुंबातील लोकांशी मतभेद होतील. प्रेमसंबंधात या महिन्यात चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. जोडीदाराच्या तब्येतीमुळे चिंतेत राहाल.
सिंह – मेहनतीचे फळ मिळेल
ऑगस्ट महिना सिंह राशीसाठी शुभ असणार आहे. या राशींच्या लोकांना इच्छित परिणाम मिळतील. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. मोठे यश मिळाले कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भातील प्रवास शुभ ठरतील. खास व्यक्तीला भेटल्याने भविष्यात फायदा होईल. सरकारी संबंधित प्रलंबित कामे पूर्ण होतील. राजकारणी लोकांना मोठ्या जबाबदारी मिळतील. कुटुंबाशी संबंधित मोठा निर्णय घ्याल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. ज्यामुळे तुम्ही वेळेवर काम पूर्ण कराल. न्यायलयातील निकाल तुमच्या बाजूने लागेल. कोणातही निर्णय घाईत घेणे टाळा. महिन्याच्या उत्तरार्धात वाहन जपून चालवा, अन्यथा दुखापत होईल. प्रेमाच्या बाबतीत हा महिना शुभ राहिल. मैत्रीचे प्रेमात रुपांतर होऊ शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवाल.
कन्या – आरोग्याची काळजी घ्या.
कन्या राशीसाठी ऑगस्ट महिना संमिश्र असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला काम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागेल. या काळात आरोग्य आणि नातेसंबंधावर विशेष लक्ष द्याल. हवामानानुसार तुम्हाला शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या काळात तुमची दिनचर्या आणि खाण्याच्या सवयींवर नियंणत्रण ठेवा. प्रवास सुखकर आणि अपेक्षित लाभ देणारा असेल. व्यवसायाशी संबंधित लोकांना अपेक्षित लाभ होतील. नातेवाईकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. महिन्याच्या मध्यापर्यंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. वरिष्ठांसोबत काम केल्याने कामे लवकर पूर्ण होतील. नोकरीच्या नवीन संधी मिळत असतील तर हितचिंतकांचा सल्ला घ्या. बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रेमसंबंधात हा महिना शुभ राहिल. नात्यातील अडथळे दूर होतील. जोडीदाराशी परस्पर नाते दृढ होईल. वैवाहिक जीवन मधुर होईल.
तुळ – अडचणींचा सामना करावा लागेल
या महिन्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. ज्यामुळे तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील. तुमच्या धैर्याने किंवा परिश्रमाने मोठे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ लोक कामाची प्रशंसा करतील. कामाच्या बाबतीत मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल. यामध्ये मित्रांकडून मदत होईल. मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. कामात प्रगती आणि फायदा होईल. व्यावसायिकांनी धोकादायक योजनांमध्ये गुंतवणूक करणे टाळावे. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांनी पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी. नातेवाईकांशी काही मुद्द्यावरुन वाद होतील. शांतपणे विचार करुन मतभेद सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमच्यावर अतिरिक्त कामाशी संबंधित जबाबदाऱ्या वाढतील. ज्यामुळे तुम्ही व्यस्त राहाल. आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. शारीरिक आणि मानसिक थकवा कायम राहिल. प्रेमसंबंधात हा महिना आनंदाने भरलेला असेल. जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहातील. जोडीदाराकडून तुम्हाला सरप्राईज गिफ्ट मिळेल. कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने हा काळ चांगला असेल. आई-वडिलांचा आशीर्वाद राहिल. वैवाहिक जीवनात आनंद बहरेल.
वृश्चिक – कामात अपेक्षित यश मिळेल.
ऑगस्ट महिन्याची सुरुवात वृश्चिक राशीसाठी लकी ठरणार आहे. या काळात तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. अडकलेले पैसे अचानकपणे तुम्हाला मिळतील. कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या संपत्ती वाढ होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळेल. प्रयत्न केल्याने अपेक्षित यश मिळू शकते. महिन्याच्या मध्यात घरात धार्मिक किंवा शुभ कार्य घडतील. अविवाहितांचे लग्न जमेल. ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. स्वभावात आक्रमकता दिसून येईल. कोणाशीही बोलताना चुकीचे शब्द वापरणे टाळा. कामाच्या बाबतीत जवळच्या व्यक्तींचा सल्ला घ्या. आरोग्यामुळे प्रगतीत अडथळे येतील. व्यवसायाशी संबंधित लोकांना अपेक्षित नफा मिळेल. व्यवसायात वाढ होण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. आर्थिक स्थिती डळमळीत होईल. जोडीदाराशी नाते सुधारेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
धनु – गैरसमज वाढतील
धनु राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना चढ-उतारांचा असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला शुभफले मिळतील. या काळात बाहेरील लोकांचे सहकार्य मिळेल. प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. नियोजित कामे वेळेवर पूर्ण झाल्याने सकारात्मक राहाल. लांबचा प्रवास केल्याने थकवा जाणवेल. आहार आणि आरोग्याकडे लक्ष द्यावे. अन्यथा आरोग्य खराब होऊ शकते. वरिष्ठांच्या मदतीने वेळेवर काम साध्य कराल. नोकरदार लोकांना या काळात उच्च पद मिळेल. नातेसंबंध टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. जवळच्या व्यक्तींमध्ये गैरसमज होऊ शकतात. प्रेमसंबंधात लव्ह पार्टनरसोबत काही मुद्द्यावर वाद होतील. तुम्हाला अहंकार सोडावा लागेल. प्रियजनांसोबतचे नाते रुळावर आणण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. जोडीदाराच्या आरोग्याबाबत चिंतेत राहाल.
मकर – व्यवसायात अपेक्षित लाभ
मकर राशीसाठी ऑगस्टचा महिना अनुकूल असेल. महिन्याची सुरुवात थोडी कठीण असेल. पण नशीबाची तुम्हाला पुरेपुर साथ मिळेल. करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात प्रवास थकवणारा असेल. अपेक्षेपेक्षा कमी फले मिळतील. कुटुंबातील प्रिय व्यक्तीच्या तब्येतीकडे लक्ष द्या. अचानक आलेल्या खर्चांमुळे तुमचे आर्थिक बजेट बिघडू शकते. करिअर आणि व्यवसायात तुम्हाला मोठे निर्णय घ्यावे लागतील. त्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. कुटुंबातील सदस्यांसोबत काही मुद्द्यावरुन वाद होतील. मालमत्तेच्या संदर्भात घाईने निर्णय घेणे टाळा. महिन्याच्या शेवटची तुम्हाला यश मिळेल. प्रेम संबंधांच्या बाबतीत हा महिना शुभ राहिल. अचानक कुणाचा तरी तुमच्या आयुष्यात प्रवेश होईल. मैत्रीचे प्रेमात रुपांतर होऊ शकते. अविवाहित लोकांचे लग्न निश्चित केली. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.
कुंभ – कामाचा ताण वाढेल
कुंभ राशीसाठी हा महिना चढ-उतारांचा असेल. महिन्याच्या सुरुवातीला नातेवाईकांच्या कठोर बोलण्याने किंवा वागण्याने तुमचे मन दुखावले जाईल. तुम्हाला करिअर किंवा व्यवसायत अडचणी येऊ शकतात. अपेक्षित यश मिळविण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. नोकरदार लोकांना कामाचा ताण सहन करावा लागू शकतो. वडिलोपार्जित संपत्ती मिळवण्यात तुम्हाला अडथळे येतील. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ नसेल. व्यवहार किंवा पैसे गुंतवताना सावधगिरी बाळगा. महिन्याच्या मध्यात कामाच्या ठिकाणी बुद्धी आणि विवेकाने काम कराल. वेळेपूर्वी तुम्ही तुमचे ध्येय साध्य कराल. प्रेमसंबंधात प्रामाणिक राहा. वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करु नका.
मीन – नातेवाईकांचे सहकार्य मिळेल
मीन राशीसाठी ऑगस्टचा महिना अतिशय शुभ ठरणार आहे. या महिन्यात नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. नातेवाईकांकडून तुम्हाला पुर्ण सहकार्य मिळेल. दीर्घकाळापासून करिअर किंवा व्यवसायाच्या शोधात असणाऱ्यांना अपेक्षित संधी मिळेल. परदेशात व्यवसायत करणाऱ्या लोकांना अपेक्षित लाभ मिळेल. जवळच्या व्यक्तीच्या मदतीने मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील. घराच्या दुरुस्तीवर अधिक पैसे खर्च कराल. धार्मिक कार्यक्रमात पैसे खर्च होतील. कामात अडथळे अधिक येतील त्यासाठी सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या. प्रेमसंबंधातील गैरसमज दूर होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. जोडीदाराशी संबंधित मोठा निर्णय घ्याल.