Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Amar singh pandit On Jayant Patil : मुंडेंच्या प्रवासाचा मी साक्षीदार, अमरसिंह पंडित यांचा जयंत पाटलांवर पलटवार

11

बीड : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्याबद्दल एक खळबळजनक विधान केलं आहे. धनंजय मुंडे यांना सोबत घेणे हा आमचा आत्मघातकी प्लॅन होता असं जयंत पाटील म्हणाले. यावर अजित पवार गटाचे सरचिटणीस तसेच माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी जयंत पाटील यांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.

धनंजय मुंडे यांच्या प्रवासाचा मी साक्षीदार

अमरसिंह पंडित म्हणाले की, ”धनंजय मुंडे यांनी अनेक मोर्चे,आंदोलने काढले आणि ते यशस्वी सुद्धा करून दाखवलं आहे. 2014 ते 2019 मध्ये त्यांनी विधान परिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदाची जबाबदारी सांभाळली. त्याचा पक्षाला खूप मोठा फायदा झाला. धनंजय मुंडे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी ज्या बैठकी झाल्या त्याचा मी साक्षीदार आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाच्या जोरावर पक्षाला खूप काही देण्याचा प्रयत्न केला आहे”.

जयंत पाटील काय म्हणाले होते ?

जयंत पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात फिरत आहेत. अशातच जयंत पाटील हे शनिवारी (27 जुलै) रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असणाऱ्या सदस्यांची बैठक घेतली. यावेळी जयंत पाटील यांना अजित पवारांना भाजपमध्ये आणण्याचा प्लॅन भाजपचा होता का ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, ” गोपीनाथ मुंडे यांनी जे राजकारण केलं ते भाजप सध्या करत नाही. तो आमचाच आत्मघातकी प्लॅन होता”. असं जयंत पाटील यांनी म्हंटलं होतं.
Sharmila Thackeray : पोलिसांची दहशत नाही, हे पुरुष थांबणार नाहीत, फाशी द्या, उरण हत्या प्रकरणानंतर शर्मिला ठाकरेंचा संताप

धनंजय मुंडे कुठेही जाणार नाही

अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी सुद्धा जयंत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, ”धनंजय मुंडे कुठेही जाणार नाहीत. तसेच जयंत पाटील यांना आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही”.

दरम्यान, जयंत पाटील यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात धनंजय मुंडे यांच्याबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.