Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दोन शिक्षक दुचाकीवरुन निघाले, वाटेत नियतीने डाव साधला; वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचा एकच आक्रोश

10

अमोल सराफ, बुलढाणा : शाळेत जाण्यासाठी दोन शिक्षक मित्र सकाळी घरातून निघाले होते. पण वाटेत नियतीने काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. दररोज ज्या रस्त्याने जातात त्या मार्गावर त्यांच्यावर नियतीने डाव साधला. मोठ्या संख्येने विद्यार्थी त्यांची वाट पाहत होते, पण एक मोठी दुखद बातमी समोर आली आणि सर्वत्र शोककळा पसरली.

शिक्षकावर काळाचा घाला

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे भरधाव वेगातील मेटॉडोरने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. यात मेटॉडोरने दुचाकीला चिरडल्याने झालेल्या अपघातात एक शिक्षक जागीच ठार झाला आहे. तर त्यांचा सहकारी शिक्षक गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना आज मंगलवारी ३० जुलै रोजी घडली. खामगाव – पिंपळगाव राजा रोडवरील ऋषभ स्टाईलजवळ ही घटना घडली.
Thane Crime News : पत्नीने पहिल्या लग्नापासूनच्या मुलाची माहिती लपवली, बाळाला घरी घेऊन येताच पती संतापला, चिमुकल्यासोबत क्रूर कृत्य
खामगांव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेवर कार्यरत असलेले दोन शिक्षक आज सकाळी शाळेत जाण्यासाठी एमएच २८ एएच २०३४ या क्रमांकाच्या दुचाकीने निघाले होते. दरम्यान उपरोक्त ठिकाणी, विरुध्द दिशेने येणाऱ्या एमएच १७ टी ४६३८ क्रमांकाच्या भरधाव मेटॉडोरने त्यांच्या दुचाकीला समोरा समोर जोरदार धडक दिली. या अपघातात चिरडले गेल्याने इरफान शहा लुकमान शहा नावाच्या शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांचे सहकारी शिक्षक रफीउद्दीन शहाउद्दीन गंभीर जखमी झाले.
Man Ends Life : गल्ली ते दिल्ली उंबरे झिजवले, पण आधारवरील जन्मतारीख बदलेना; डिप्रेशनमधील तरुणाचं टोकाचं पाऊल

कुटुंबावर शोककळा

या घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी शिक्षकाला खामगाव येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. तर मृत इरफान यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला. या घटनेमुळे मृत शिक्षकाच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच मृत शिक्षकाचे नातेवाईक मोठ्या संख्येने खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले होते. या प्रकरणी पोलीस कार्यवाही सुरु असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, आपल्या शिक्षकाचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांमध्ये, शाळेत एकच शोककळा पसरली. या घटनेनंतर गावात, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.