Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

उरण हत्येच्या आरोपीची कर्नाटकात धरपकड, बिग बॉसच्या घरात धडधड, सकाळच्या दहा हेडलाईन्स

7

१. नवी मुंबईतील उरण भागात झालेल्या तरुणीच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला अटक, कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातून मुसक्या आवळल्या, इथे क्लिक करुन वाचा सविस्तर

२. भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेतील मुंबै बँकेवर एकनाथ शिंदे सरकारची मेहेरनजर, सहकार भवन बांधण्यासाठी गोरेगाव भागात तीन एकर जागा

३. विधानसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं खास मिशन, भाजपचं टेन्शन वाढलं, १०० पेक्षा अधिक उमेदवार देण्याची तयारी, शिवसेनेने जिंकलेल्या ५६ जागांसह सेनेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मतदारसंघांवर दावा करणार

४. योजनांच्या प्रसिद्धीसाठी २७० कोटी रुपयांची तरतूद, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा मेगा प्लॅन, विशेष प्रसिद्धी मोहिमे अंतर्गत वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या, रेडिओ, बाह्य व अन्य माध्यमे, समाजमाध्यमे, डिजिटल माध्यमे यांसह विविध नवमाध्यमांद्वारे सरकारी योजनांची प्रसिद्धी केली जाणार

५. झारखंडमधील चक्रधरपूर येथील बडाबांबो रेल्वे स्थानकाजवळ हावडा-मुंबई मेलला भीषण अपघात, मंगळवारी पहाटेच्या सुमारास दुर्घटना, अपघातात ६ प्रवासी जखमी, जोरदार आवाज अन् प्रवाशांमध्ये घबराट, गाडीचे १८ डबे रुळावरुन कसे घसरले? धक्कादायक कारण जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

६. केरळमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालं, ढिगाऱ्याखाली १०० हून अधिक जण अडकल्याची भीती, पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी दुर्घटना, बचावकार्य सुरु

७. बिग बॉस मराठीच्या घरात दुसऱ्या दिवसापासूनच प्रेमाचे वारे, निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल हे दोन स्पर्धक झाले रोमॅन्टिक, प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल

८. ठरलं तर मग मालिकेत प्रतिमाच्या परतण्याने किल्लेदार-सुभेदार आनंदी, मात्र आपल्या घरातून प्रतिमाचे दागिने चोरी झाल्याचे महिपतला समजलंच, आता नागराजची खैर नाही! दुसरीकडे चुरुचुरु बोलणाऱ्या खोट्या तन्वीला पूर्णा आजीने अखेर दाखवली जागा, सायलीचं कौतुक

९. मनिका बत्राने इतिहास रचला; पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या टेबल टेनिस खेळात १६ व्या राऊण्डमध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली

१०. २२ वर्षानंतर ‘आयरन मॅन’चा टेनिसला अलविदा, भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपण्णा याचा टेनिसमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय, चाहते हळहळले

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.