Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महालक्ष्मी रेसकोर्सवरील सुमारे १२० एकर क्षेत्र आणि त्यासोबत मुंबई सागरी किनारा मार्ग प्रकल्पातील सुमारे १७५ एकर क्षेत्र असे संपूर्ण मिळून जवळपास ३०० एकर क्षेत्रावर सेंट्रल पार्कची उभारणी केली जाणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्स भूखंडावरील एकूण २११ एकरपैकी सुमारे ९१ एकर भूखंड ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यांना देण्याच्या करारावरही जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई महापालिकेला १२० एकर जागा प्राप्त झाल्याने न्यूयॉर्क, लंडनच्या धर्तीवर सेंट्रल पार्क उभारण्याच्या कामाला महापालिका गती देणार आहे.
रेसकोर्स येथूनच सागरी किनाऱ्याला जोडणारा भुयारी मार्ग
या कामासाठी मुंबई महापालिकेकडून आराखडा केला जाणार असून त्याचे काम सुरू झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. महापालिकेच्या मुंबई सागरी किनारा मार्ग प्रकल्पात तब्बल १७५ एकर मोकळी जागा उपलब्ध होणार असून तेथेही उद्यानासाठी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. रेसकोर्स येथूनच भुयारी मार्ग करून तो सागरी किनारा मार्गालाही थेट जोडण्याचे नियोजन आहे. हे पार्क एक ते दीड वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले असून पार्कच्या कामासाठी लवकरच निविदाही काढली जाणार आहे.
पार्काची वैशिष्ट्ये
या पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात उद्याने, विविध प्रकारची झाडे, आसन व्यवस्था, जायंट व्हील यांसह अद्ययावत सुविधा दिल्या जाणार आहेत. रेसकोर्सवर कोणत्याही प्रकारचे मोठे बांधकाम करू नये, अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतली होती.