Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
२. मुंबईकरांना शिंदे सरकारकडून गिफ्ट, महालक्ष्मी रेसकॉर्सवर आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य सेंट्रल पार्क उभारणार, लागणारा भूखंडही महापालिकेच्या ताब्यात, लवकरच आराखडा, कोणतेही मोठे बांधकाम न करता आणि रेसकोर्सला धक्का न लागता या पार्कची उभारणी करण्याचा निर्णय, बीएमसीचे नियोजन
३. नवी मुंबईतील उरण येथील तरुणीच्या हत्या प्रकरणात नवीन माहिती उघड, आरोपी दाऊद शेखला भेटण्यापूर्वी मैत्रिणीकडे गेल्याची महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती, खुनामागील अनेक गुपितं उलगडण्याची शक्यता
४. अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडणारा मनसे कार्यकर्ता जय मालोकार याचा हार्ट अटॅकने मृत्यू, मिटकरीही हळहळले, राजकारणाच्या घसरत्या स्तराविषयी खेद, कष्टाळू मायबापाचं लेकरु गेल्याचं वाईट वाटतं, मिटकरींची पहिली प्रतिक्रिया, या घटनेनंतर मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोणतं आवाहन केलं, इथे क्लिक करुन सविस्तर वाचा
५. राज्यात २५ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका, लाखो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली, पीक पाहणी अहवालातून नवीन माहिती समोर
६. बिहारमध्ये पदवीपर्यंत शिक्षण, परंतु बँकेत खातं उघडता न आल्याने चिडचिड, तरुणाने चक्क बँक लुटण्याचा कट रचला, सिडको बँक दरोड्यामागील धक्कादायक कारण उघड
७. अभिनेत्री क्रिती सेनॉनचा कथित बॉयफ्रेंड कबीर बहिया आहे गडगंज श्रीमंत, यूकेमध्ये ४२.७ कोटींच्या संपत्तीचा मालक असल्याची चर्चा, मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर शोध
८. ठरलं तर मग मालिकेत पूर्णा आजीने लाडक्या नातसुनेला घेतलं कुशीत, सायली ठरतेय प्रियाच्या वरचढ, अपरात्री घरातून निघणाऱ्या प्रतिमा-रविराजला पूर्णाईने अडवलं, तर प्रतिमा जिवंत असल्यावरुन चिडलेल्या नागराजने महिपतच्या मुसक्या धरल्या, परंतु घरात दागिन्यांवर डल्ला मारणारा नागराज असल्याचं समजताच महिपतचा तीळपापड
९. आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट, कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले
१०. मनू भाकरच्या डबल सेलिब्रेशननंतर पॅरिस ऑलिम्पिक्स २०२४ मध्ये भारताला नेमबाजीतून पदक मिळण्याची आज पुन्हा एकदा आशा; आज ३१ जुलै रोजी कोणकोणत्या स्पर्धा रंगणार, इथे क्लिक करुन वाचा आजच्या दिवसाचे संपूर्ण वेळापत्रक