Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Central Railway Big Megablock: मध्य रेल्वेचा 10 दिवसांचा मेगाब्लॉक, प्रवाशांचे प्रचंड हाल होणार; एकूण इतक्या गाड्या रद्द

9

नागपूर (जितेंद्र खापरे): मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मोठा मेगाब्लॉक करण्यात येत आहे. हा मेगाब्लॉक 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्टपर्यंत राहणार आहे. या काळात अनेक अभियांत्रिकी कामे केली जातील. मेगाब्लॉकमुळे नागपूर-भुसावळ मार्गावरील 11 गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. वेगवेगळ्या तारखांना गाड्या रद्द केल्या जातील. या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहे. तसेच भुसावळ विभागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे.

सेलू रोड स्थानकावर ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’साठी विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे. सेलू रोड स्टेशनवर ‘यार्ड रिमॉड्युलेटिंग’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ कामासाठी ‘प्री नॉन इंटरलॉकिंग’ आणि ‘नॉन इंटरलॉकिंग’ काम केले जाईल. तसेच, तिसरी लाईन आणि चौथी लाईन , वर्धा-नागपूर दरम्यान ‘लाँग हॉल लूप लाईन’ला ‘कनेक्टिव्हिटी’ प्रदान केली जात आहे. त्यांचे कामही या विशेष ब्लॉक दरम्यान केले जाणार आहे.
UPSCची मोठी कारवाई! वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द, भविष्यात कोणतीही परीक्षा देता येणार नाही

या एक्स्प्रेस गाड्या रद्द राहतील तर मेगाब्लॉकमुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला.

गाडी क्रमांक 12119 अमरावती-अजनी एक्स्प्रेस 1 ते 3, 5, 6, 10 आणि 11 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली आहे.

गाडी क्रमांक 12120 अजनी-अमरावती एक्स्प्रेस 1, 3, 5, 6, 10 आणि 11 ऑगस्ट रोजी रद्द राहील.

गाडी क्रमांक 12159 अमरावती-जबलपूर एक्सप्रेस 04, 05, 09, 10 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली आहे.

गाडी क्रमांक 12169 अमरावती-जबलपूर एक्सप्रेस 04, 05, 09, 10 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली आहे.

गाडी क्रमांक 12160 जबलपूर-अमरावती एक्स्प्रेस 05, 06,10 आणि 11 ऑगस्ट रोजी रद्द राहील.

गाडी क्रमांक 22124 अजनी-पुणे हमसफर एक्सप्रेस 6 ऑगस्ट,गाडी क्रमांक 22117 पुणे-अमरावती एक्सप्रेस 7 ऑगस्ट,गाडी क्रमांक 22141 पुणे-नागपूर हमसफर 08 ऑगस्ट,गाडी क्रमांक 22118 अमरावती-पुणे एक्सप्रेस 08 ऑगस्ट, गाडी क्रमांक 22142 नागपूर-पुणे हमसफर एक्सप्रेस 9 ऑगस्ट, गाडी क्रमांक 22139 पुणे-अजनी हमसफर एक्सप्रेस १० ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली आहे

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.