Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Chandrashekhar Bawankule: उद्धव ठाकरे, फडणवीसचं राजकारण संपवायला तुम्हाला १०० जन्म लागतील; बावनकुळेंचा पलटवार

10

नागपूर (जितेंद्र खापरे) : उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. उद्धव म्हणाले, देवेंद्र फडणवीस आता राजकारणात राहणार की मी. यासह, त्यांनी काही चुकीचे केले तर ते तोडून टाकतील. उद्धव यांच्या वक्तव्यावर भाजप आक्रमक झाली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला आहे. बावनकुळे म्हणाले, फडणवीसांचे राजकारण संपवायला १०० जन्म लागतील.

आपल्या अधिकृत X अकाउंट वर लिहिताना बावनकुळे म्हणाले,” उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी ज्या भाषेचा वापर केला आहे, त्यातून त्यांनी मानसिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे, देवेंद्र फडणवीस आणि तुमची काय क्षमता आहे. हे राज्य संस्कारमय राज्य आहे. सर्व धर्म, सर्व समाज येथे एकत्र राहतो. जातीपातीचे राजकारण करून समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले आहे, त्यांच्या विभाजणकारी भाषेवर आमचा आक्षेप आहेच. भाजपा त्याच्या ‘आ रेच्या भाषेला का रे’ अशा शब्दात उत्तर देईल असेही बावनकुळे म्हणाले.
UPSCची मोठी कारवाई! वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द, भविष्यात कोणतीही परीक्षा देता येणार नाही

बावनकुळे पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंना चिथावणी देणारी भाषा शोभत नाही, त्यांनी ज्याप्रकारच्या शब्दांचा वापर केला, ते जर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ऐकले असते तर त्यांना काय वाटले असते. उद्धव ठाकरे अशा भाषेचा वापर हिंदुत्व सोडून ख्रिश्चन आणि मुस्लिम मतांच्या भरवशावर करत आहे. देवेंद्र फडणवीस राज्याला विकासाकडे नेणारे आणि नवे व्हिजन देणारे नेतृत्त्व आहे. उद्धव ठाकरे हे आता जाती-पातीच्या राजकारणावर उतरले असून धर्माच्या आधारावर मते घेण्याची भाषा करत आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांना मतांना झोडपल्याशिवाय राहणार नाही. असेही बावनकुळे म्हणाले.
Central Railway Big Megablock: मध्य रेल्वेचा 10 दिवसांचा मेगाब्लॉक, प्रवाशांचे प्रचंड हाल होणार; एकूण इतक्या गाड्या रद्द

१० वर्षे मोदींच्या सभामुळे उद्धव ठाकरे यांचे खासदार निवडून आले, पण आता ते उपकार विसरले आहे. एकीकडे भगवान शंकराचे नाव घेणे आणि अशी भाषा वापरणे ही कोणती संस्कृती आणि परंपरा आहे? नाशिक, परभणी आणि मुंबईत उबाठा गटाच्या विजयी मिरवणुकांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवण्यात आले. उद्धव ठाकरेंनी जातीवादी राजकारण करून समाजा समाजात तेढ निर्माण केले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.