Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अण्णाभाऊ साठेंचा आगळा वेगळा चाहता, जयंतीनिमित्त विकत घेतला आकाशात तारा; कसा बघता येणार तारा?

9

छत्रपती संभाजीनगर : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०४व्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरच्या एका युवा उद्योजकाने अण्णाभाऊ साठेंच्या नावाने आकाशातील तार्‍याची रजिस्ट्री केली आहे. हा आकाशातील तारा एक ऑगस्ट रोजी प्रत्येकाला बघता येणार आहे. युवा उद्योजकाने दिलेल्या या अनोख्या अभिवादनामुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे समाज सुधारण्याचे काम केलं. यामुळे अण्णाभाऊंची जयंती दरवर्षी उत्साहात साजरी होते. गेल्या वर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एका अनुयायाने आकाशातील तारा विकत घेऊन अभिवादन केलं होतं. त्यातून प्रेरणा घेऊन छत्रपती संभाजीनगर शहरातील युवा उद्योजक सुशील तुपे यांनी देखील अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आकाशातील तार्‍याची रजिस्ट्री केली आहे.
Chandrashekhar Bawankule: उद्धव ठाकरे, फडणवीसचं राजकारण संपवायला तुम्हाला १०० जन्म लागतील; बावनकुळेंचा पलटवार

सहा महिन्यांच्या प्रयत्नानंतर यश

सुशील तुपे यांना ही संकल्पना सुचल्यानंतर त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा केली त्यानंतर अमेरिका येथील इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री या संस्थेकडे त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल माहिती असलेले सर्व कागदपत्र त्या संस्थेला दिले. त्यानंतर एक महिन्याच्या कालावधीमध्ये संस्थेची फी भरून रजिस्ट्री करण्यात आली. ही रजिस्ट्री आता अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने कायमस्वरूपी राहणार आहे. समाज सुधारक अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल जगाला माहिती व्हावी या उद्देशाने ह्या तारेची रजिस्ट्री करण्यात आल्याचं तुपे म्हणाले.

असा बघता येणार आकाशातील तारा

१ ऑगस्ट रोजी हा तारा प्रत्येकाला बघता येणार आहे. यासाठी मोबाईल प्ले स्टोअरमध्ये जाऊन स्पेस रजिस्ट्री किंवा स्टार नेहमी अॅप्लीकेशन डाउनलोड करावे लागेल. एप्लीकेशन मध्ये रजिस्टर केलेल्या ताऱ्याचा नंबर WVP773557 टाकून बघू शकता. तसेच द इनोव्हेटिव्ह युजर स्टार फाईंडर थ्रीडी स्मार्टफोन ॲप अँड्रॉइड अँड आयफोन वरून देखील हा तारा बघता येईल, अशी माहिती सुशील तुपे यांनी दिली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.