Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
काल पुण्यामध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनशी बोलताना मनसे नेते आशिष साबळे यांनी अमोल मिटकरी जेव्हा पुण्यात येतील तेव्हा त्यांना चोपणार आहोत, मनसे स्टाईल त्यांचा सत्कार करणार असा थेट इशारा दिला होता. त्यानंतर आता अमोल मिटकरी यांना चोपण्याची भाषा करणाऱ्या मनसे नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे खडे बोल सुनावले आहेत.
तेव्हा तुमचे हात सुद्धा आम्ही ठेवणार नाही…
पुण्यामध्ये मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, अमोल मिटकरी आले की चोपून काढू, कपडे फाडून मारु, तुमच्या बापाचं राज्य नाही. पुण्यामध्ये असेल, महाराष्ट्रमध्ये असेल कायद्याच्या बापाचं राज्य आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही जर कपडे काढून जो मारण्याची भाषा करत असाल, तर ते कपडे जेव्हा तुम्ही काढायला पुढे याल तेव्हा तुमचे हात सुद्धा आम्ही ठेवणार नाही. एवढी ताकद आम्ही ठेवतो, अशा शब्दात रुपाली पाटील यांनी मनसे नेत्यांना ताकीद दिली.
राजकारण एवढं खालच्या दर्जाला गेलं आहे का?
पुण्यात धोधो पाऊस पडला आणि जनजीवन विस्कळित झालं. प्रत्येक नेता पुण्यात येऊन भेटून गेले, बोलून गेले. मा. राज ठाकरेसाहेब हे सुद्धा पुण्यामध्ये आले आणि पुण्याला सांगत असताना किंवा पुण्याच्या कारभारावर बोट ठेवत असताना त्यांनी नेत्यांवर टीका केली. जेव्हा राजसाहेबांनी नेत्यांवर टीका केली तेव्हा माननीय अजितदादांवर टीका केली. त्यानंतर स्वाभाविक आहे की राष्ट्रवादी काँग्रेसकडून डायरेक्ट उत्तर देण्यात आलं. परंतु, राजकारणाचा दर्जा एवढा खाली चालला आहे की, प्रत्युत्तर दिलं म्हणून मनसेकडून किंवा मनसेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी थेट हाणामारीची भाषा वापरली. समोरच्याला हुसकावून लावण्याची होती. त्यामध्ये मनसेच्या काही लोकांनी आमदार अमोल मिटकरींची गाडी फोडली. त्यानंतर जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला म्हणून जवळजवळ २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले त्यापैकी एक कार्यकर्त्याचा बीपी शूट होऊन त्याला हार्ट अटॅक येऊनगेला. एवढं राजकारण कुचकं आणि खालच्या दर्जाचं आपण केलं आहे का? याचा विचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक नेत्याने करणं गरजेचं आहे, असं रुपाली पाटील म्हणाल्या.
विचारांची लढाई झाली पाहिजे, तुम्ही जर टीका करता तर टीका सहन करायची ताकद पाहिजे. परंतु तसं न करता राजकारणामध्ये जी गुन्हेगारी आणण्याचा प्रयत्न करतायेत, त्यामध्ये आपलाच कार्यकर्ता जीवानिशी जात असेल त्याचा उपयोग काय? कारण पक्ष हा कार्यकर्त्यांवर चालतो. असा आपला कार्यकर्ता सहकारी मध्येच सोडून जात असेल तर अशा लढाईचा उपयोग काय? असं रुपाली पाटील म्हणाल्या.
आपला हा गुन्हेगारीचा आखाडा नाही. राजकारणाचा आखाडा आहे. राजकारणामध्ये आचार विचारावर बोललं पाहिजे. विकासावर बोललं पाहिजे आणि हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला समजावलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. हे सगळं करायला कुठल्या नेत्यांनी सांगितलं असेल म्हणजे माननीय राज साहेबांनी सांगितलं असेल, असे मी म्हणत नाही. राजसाहेबांनी टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून त्याला प्रत्युत्तर गेल्यानंतर ही जी खालची मंडळी आहेत, जे मारण्याची धमकी देतात या सगळ्यांवर कायद्याने कारवाई झाली पाहिजे. मी तर पुणे पोलिसांना आणि गृहखात्याला विनंती करेन, की जे जे कोणी राजकारणाच्या नावाखाली गुन्हेगारी पसरवतात, दहशत निर्माण करतात, त्यांना एक वर्षासाठी तुरुंगात टाका, त्याच्याशिवाय यांना राजकारण काय आहे आणि गुन्हेगारी काय आहे हे समजणार नाही, असं रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.