Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

वन विभागात रोप लागवड घोटाळा, बड्या जागेवरील अधिकारी निलंबित; नेमकं प्रकरण काय?

7

गडचिरोली : गडचिरोली वनविभागात रोपवन लागवड घोटाळा उघड झाला असून या प्रकरणी चातगाव वनपरीक्षेत्र अधिकारी संजय पडवे यांना निलंबित करण्यात आले आहे. पडवे यांच्या गैर व्यवहाराची वरिष्ठ स्तरावर तक्रार करण्यात आली होती. चौकशीत ते दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली. कारवाईने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.गडचिरोली वनवृत्तातील वनविभाग गडचिरोली अंतर्गत चातगाव वनपरिक्षेत्राचा समावेश होतो. मार्च २०२१ ते २०२४ पर्यंत करण्यात आलेली रोपवन लागवड, हेक्टरी मोजमाप, हेक्टरी लावण्यात आलेली झाडे आणि जगविलेली झाडे, प्रत्यक्ष लागवड न करता पैशाची उचल करणे असे अनेक आरोप ठेवत भारतीय जनसंसदचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी तक्रार केली होती. प्रत्येक कामावर लावलेल्या मजुरांचे व्हाऊचर, मजुरांच्या सह्यांची खात्री करणे, मोजमाप पुस्तिका, प्रत्येक मजुराची प्रत्येक कामावरील बँक खाते पुस्तिका तपासून घेतल्यास हा घोळ स्पष्टपणे दिसणार असल्याचे त्यांनी वनमंत्री, वन सचिवांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते.
Swapnil Kusale: कोल्हापुरच्या वारकरी कुटुंबातील स्वप्निल ऑलिम्पिक पदकापासून एक पाऊल दूर; गुरुवारी होणार फायनल…

याशिवाय साहित्य खरेदीमधील कोटेशन, जीएसटीची बिले तपासण्याची मागणी केली होती. वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या निर्देशावरून वनरक्षक, वनपालांनी अनेक कामांवर अनेक बोगस मजूर दाखवून शासकीय निधी हडप केला असल्याची चर्चा होती. याशिवाय चातगाव वनपरिक्षेत्रात अतिक्रमण,अवैध उत्खनन, वृक्षतोडही झाल्याचा संशय होता.

पडवे यांनी वनपालामार्फत आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशीही मागणी खरवडे यांनी केली होती. दरम्यान मुख्य वनसंरक्षक एस.रमेशकुमार यांनी या तक्रारीची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी केली. त्यात पडवे दोषी आढळले. प्रधान सचिवांच्या निर्देशानुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

गडचिरोलीत दमदार पाऊस

संततधार पावसामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने गडचिरोली जिल्ह्यातील तीसहून अधिक मार्गावरील वाहतूक थांबली आहे. दक्षिण गडचिरोलीतील पाच तालुक्यांसह नागपूर-गडचिरोलीचा संपर्क तुटला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. नदी, नाल्यांना पूर आला आहे. दोन दिवसांपूर्वी पावसाचा जोर काहीसा ओसरला. दोन दिवसांपासून परत पावसाने जोर धरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वैनगंगा, प्राणहिता, शिवनी, पाल, खोब्रागडी या नद्यांना पूर आला आहे. पाल नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने गडचिरोली-नागपूरचा संपर्क तुटला. गडचिरोली-चामोर्शी-आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गावरील शिवनी नाल्यावरील पूल पुराच्या पाण्याखाली गेला आहे. या पुलावरील वाहतूक थांबल्याने पाच तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली असल्याने भामरागडचा चार दिवसांपासून संपर्क तुटलेला आहे. अंतर्गत रस्ते, राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गही पाण्याखाली आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.