Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बदलापूर रेल्वे स्थानकावर अपघात टळला, ब्रेकफेल मालगाडी फलाट नंबर १च्या रुळावर; डाऊन मार्ग ३ तासांहून अधिक काळ बंद

9

महेश चेमटे, बदलापूर : मालगाडीचे ब्रेक कार्यान्वित न झाल्याने बदलापूर होम फलाटाच्या रुळांवर मालगाडी गेल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे. पेणजवळील डोलवी पासून निघालेली मालगाडी मद्रासमधील कोरुक्कुपेट (दक्षिण रेल्वे) येथे जाणार होती. बदलापूर परिसरात साडेचार वाजण्याच्या सुमारास ही गाडी पोहोचली. गाडीला लाल सिग्नल देण्यात आला होता. मालगाडीचे ब्रेक फेल झाल्याने गाडी अन्य रुळांवर गेली. त्यानंतर इंजिन बंद झाल्याने गाडी त्याच ठिकाणी थांबली. दरम्यान बदलापूर होम फलाटावर लोकल उभी नसल्याने लोकल आणि मालगाडी यांच्यातील अपघात थोडक्यात टळला आहे.

थोडक्यात अपघात टळला

बदलापूरच्या प्लॅटफॉर्म नंबर १ वर कोणतीही लोकल उभी नव्हती. त्यामुळे प्लॅटफॉर्म १ वर आलेल्या मालगाडी आणि लोकलमधील अपघात थोडक्यात टळला. मालगाडीचे इंजिन बंद झाल्याने तीन तासाहून अधिक वेळ डाउन मार्ग बंद आहे. सध्या सीएसएमटीहून सुटणाऱ्या लोकल अंबरनाथ स्थानकापर्यंत चालवण्यात येत आहेत. दरम्यान दुर्घटनेत सहा लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून लांब पल्ल्यांच्या मेल-एक्स्प्रेसवर त्याचा परिणाम झाला आहे.
Ganapati Special Konkan Railway : कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, गणपतीसाठी आणखी २० फेऱ्या; कुठून, कधी आणि काय असणार वेळ?

६.५० वाजता कर्जतकडील वाहतूक पूर्ववत

दरम्यान, संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अप मार्ग सुरू झाला असून डाऊन मार्ग सुरू करण्याचं काम सुरू करण्यात आलं. डाउन मार्ग अर्थात कर्जतकडे जाणारी वाहतूक ६.५० वाजता पूर्ववत करण्यात आली आहे. या घटनेनंतर मालगाडीच्या लोको पायलटला गाडीतून उतरवण्यात आलं आहे. तसंच याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Uran Case : दोघं शाळेत एकत्र, आरोपीविरोधात २०१९ मध्ये गुन्हा; त्याला भेटायला गेली आणि… पोलिसांची महत्त्वाची माहिती
दरम्यान, बदलापूर स्थानकावर मालगाडी थांबल्याने इतर ट्रेनवर त्याचा मोठा परिणाम झाला. मुंबईहून निघालेल्या लोकल ट्रेन अंबरनाथपर्यंत चालवण्यात येत होत्या. अंबरनाथहून पुन्हा ट्रेन मुंबईकडे रवाना करण्यात येत होते. अंबरनाथपर्यंतच गाड्या येत असल्याने बदलापूरकडे येणारे अनेक प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उतरुन पुढे चालत बदलापूरपर्यंत पोहोचत होते. तसंच कर्जतहून मुंबईकडे येणाऱ्या ट्रेन पूर्णपणे ठप्प करण्यात आल्या होत्या. कर्जतहून मुंबईकडे येणारी वाहतूक तीन तासांहून अधिक काळ बंद होती.

मंगळवारी देखील दुपारच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने ट्रेनच्या एकामागे एक रांगा लागल्या होत्या. सीएसएमटी ते मशीद दरम्यान दुपारी अडीच ते सव्वा तीन दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. सुरुवातीला अप आणि त्यानंतर डाउन मार्गावर बिघाड झाल्याने एकामागे एक लोकलच्या रांगा लागल्या होत्या.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.