Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Yugendra Pawar: बारामतीत सखा पुतण्या अजित पवारांच्या विरोधात शड्डू ठोकणार; युगेंद्र पवारांमुळे वातावरण ढवळून निघाले

10

बारामती (दीपक पडकर): लोकसभा निवडणूक प्रचार काळात हाय होल्टेज ठरलेल्या बारामती मतदारसंघाची निवडणूक निकालात मात्र एकतर्फी झाल्याचे स्पष्ट झाले. आता दोन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीतही येथे पवार विरुद्ध पवार अशीच लढत होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्ये पुतणे युगेंद्र हेच शड्डू ठोकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी गाव भेट दौरे सुरु केले असून त्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे.

राष्ट्रवादीतील फूटीनंतर बारामतीतही पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उभी फूट पडली आहे. महत्त्वाच्या संस्था अजित पवार गटाच्या ताब्यात आहेत. परंतु सर्वसामान्य लोक शरदचंद्र पवार गटाकडे असल्याचे लोकसभा निवडणूकीत दिसून आले. आता विधानसभेचे वेध तालुक्याला लागले आहेत. एकीकडे शरदचंद्र पवार गटाने त्यासाठी कंबर कसली आहे. तर अजित पवार गटाकडून अद्याप फारशा हालचाली सुरु झालेल्या नाहीत.
Pooja Khedkar: UPSCनंतर आता कोर्टाकडून पूजा खेडकर यांना झटका; दिल्ली न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

लोकसभा निवडणूकीत मी दिलेल्या उमेदवाराला दगाफटका झाला तर विधानसभेला मी वेगळा विचार करेन, असे अजित पवार म्हणाले होते. परंतु तरीही विधानसभेला राष्ट्रवादीचे तेच येथील उमेदवार असतील हे स्पष्ट आहे. शरदचंद्र पवार गटाकडून सध्या तरी युगेंद्र यांचे नाव पुढे येत आहे. त्यांनी गेल्या वर्षभरात बारामती शहर, तालुक्यात तशी बांधणी सुरु केली आहे. आत्या सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा प्रचारात युगेंद्र यांनी झोकून काम करत रिझल्ट दाखवून दिला आहे. परिणामी त्यांनी उमेदवारीची मागणी केली तरी ती डावलली जाणार नाही, अशीच सध्या स्थिती आहे.
Chandrashekhar Bawankule: उद्धव ठाकरे, फडणवीसचं राजकारण संपवायला तुम्हाला १०० जन्म लागतील; बावनकुळेंचा पलटवार

दर आठवड्याला ते बारामतीत जनता दरबार घेत प्रश्न सोडवत आहेत. तालुक्यात त्यांनी गावभेट दौरे सुरु केले आहेत. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणूकीनंतर अजित पवार यांचा जनसन्मान मेळावा हा एकमेव जाहीर कार्यक्रम बारामतीत पार पडला. दर आठवड्याला बारामतीला येणारे अजित पवार आता राज्याच्या जबाबदारीत अडकून पडले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत येथील किल्ला कोणी लढवायचा याबाबत त्यांच्या पक्षात एकमत नाही. किंबहुना कोणी पुढाकार घेतला तर त्याच्या पायात पाय घालण्याचेच काम येथे होताना दिसते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून अद्याप प्रचाराला सुरुवात झालेली नाही.

गत निवडणूकीत १ लाख ६५ हजारांच्या मताधिक्याने अजित पवार विजयी झाले होते. आता पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होवू घातली आहे. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी नक्कीच सोपी नसेल. त्यात लोकसभेचा पराभव पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला असून त्यातून ते अद्याप बाहेर पडलेले नाहीत. पराभवातून काही शिकून त्यात दुरुस्त्या करण्यासाठी अजित पवार गटाकडे वेळ होता. परंतु त्यांनी ते ही केलेले दिसत नाही. परिणामी येणारी निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नसेल हे निश्चित.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.