Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Pooja Khedkar Case: पूजा खेडकरचा आणखी एक कारनामा उघड; नाव बदलून तब्बल १२ वेळा दिली UPSC परीक्षा

7

म. टा. प्रतिनिधी, पुणे : वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा दिलीप खेडकर हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा विभागाचीच (यूपीएससी) फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. नऊ वेळा परीक्षा देण्याची मुभा असतानाही तिने बारा वेळा परीक्षा दिल्याची धक्कादायक माहिती केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) पाठविलेल्या नोटिशीत समोर आली. त्याशिवाय परीक्षेसाठी त्यांनी इतर मागासवर्गासह (ओबीसी) बहुविकलांग प्रवर्गातून परीक्षा अर्ज भरला असून, वेळोवेळी आई-वडिलांच्या नावांतही बदल केला होता.

केंद्र सरकारच्या उपसचिव कविता चौहान यांनी या संदर्भात पूजा खेडकरला नुकतीच नोटीस पाठविली. ही नोटीस प्रशासनामार्फत तिच्या बाणेर येथील बंगल्याबाहेरही चिकटविण्यात आली. दरम्यान, पोलिसांकडून समन्स बजावूनही ती अद्याप पोलिसांसमोर हजर झालेली नाही. यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी विविध प्रवर्गांसाठी किती वेळा परीक्षा देता येऊ शकते याच्या अटी आहेत. खेडकर यांची २०२२ मधील आयएएस म्हणून बहुविकलांग या प्रवर्गातील ‘पर्सन वुइथ बेंचमार्क डिसअबिलिटीज’ (पीडब्ल्यूबीडी) या विशेष उपवर्गातून निवड झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पूजाच्या नावातील बदल

– पूजा खेडकर २०१२पासून परीक्षा देत होती. २०१२ ते २०१५पर्यंत तिने ‘पूजा दिलीपराव खेडकर’ या नावाने परीक्षा दिली. त्या वेळी वडिलांचे नाव ‘दिलीप कोंडिबा खेडकर’, तर आईचा उल्लेख ‘मनोरमा दिलीपराव खेडकर’ असा केला.
– सन २०१६पासून वडिलांचे नाव कायम ठेवून २०१८पर्यंत आईचे नाव ‘मनोरमा जगन्नाथ बुधवंत’ असे लिहिले.
– सन २०१९मध्ये आईचे नाव ‘मनोरमा जे. बुधवंत’ असे, तर वडिलांचे नाव ‘खेडकर दिलीपराव के.’ असे लिहिले.
– सन २०२३पर्यंत दिलेल्या विविध परीक्षांमध्ये आई-वडिलांच्या नावांमध्ये बदल केले.
– सन २०२१ ते २०२३ या दरम्यान दिलेल्या परीक्षांमध्ये ‘पूजा मनोरमा दिलीपराव खेडकर’ असे नाव वापरले.

मसुरीच्या संस्थेकडून वर्तन अहवाल सादर

– मसुरीतील लालबहादूर शास्त्री नॅशनल अॅकेडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनने घेतलेल्या फाउंडेशन कोर्स काळात पूजा खेडकरला पाच वेळा ‘मेमो’ दिला होता. इतर कारणांसाठी तीनदा मेमो देण्यात आला.
– शिस्त आणि नियमांचे पालन करण्याबाबत १५ पैकी ३.१४ इतकेच गुण मिळाले होते. एकूण प्रशिक्षण काळात २०० पैकी १०५.१३ इतके गुण मिळाले होते, अशी माहिती मसुरीच्या संस्थेने ‘यूपीएससी’ला दिल्याकडे नोटिशीत लक्ष वेधले.

पहिल्याच नियुक्तीत जिल्हाबदल

महाराष्ट्र केडरमध्ये तिचा समावेश करताना तिला प्रशिक्षणासाठी सुरुवातीला भंडारा जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आली होती. मात्र, त्याऐवजी तिने पुण्याची निवड करून राज्य सरकारने ती बदलल्याची माहिती मसुरीच्या संस्थेने दिली. या दरम्यान, त्यांच्या वर्तणुकीसाठी अनेकदा समुपदेशनही करण्याची सूचना करण्यात आली होती. राज्य सरकारच्या अहवालातही खेडकर या आयएएस अधिकारी म्हणून काम करण्यास अयोग्य असल्याचे म्हटले असून, त्यांची वर्तणूक गंभीर असल्याचे ताशेरे ओढण्यात आले आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.