Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

हिंदू मतांसाठी भाजपची रणनीती; मुंबईतील ३६ मतदारसंघांत करणार चाचपणी

15

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात सत्ता आणण्यासाठी मुंबईतील ३६ मतदारसंघ महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने प्रत्येक मतदारसंघात तळागाळात फिरून भाजप स्वतंत्र अहवाल तयार करणार असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. या अहवालाच्या आधारे कोणाला परत संधी द्यायची आणि कोणत्या मतदारसंघात नवा चेहरा द्यायचा, हे ठरवले जाणार आहे. विशेष म्हणजे एकगठ्ठा मुस्लिम मतदारांवर जालीम उपाय म्हणून मुंबईतील ३६ मतदारसंघांतील सर्व हिंदू मतदार कसा एकत्रित मतदानासाठी रस्त्यावर उतरवता येईल यादृष्टीनेही या अहवालाच्या माध्यमातून विशेष रणनीती आखली जाणार असल्याचे समजते.आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मुंबईसाठी विशेष नियोजन केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. सहप्रभारी अश्विनी वैष्णव हे या दृष्टीने मुंबईकडे विशेष लक्ष देणार आहेत. मुंबईच्या ३६ विधानसभा मतदारसंघासाठी बैठका घेऊन भाजपकडून विशेष रणनीती ठरवण्यात येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य मिळालेले मतदारसंघ आणि मताधिक्य न मिळालेले मतदारसंघ अशी वर्गवारी करून त्यादृष्टीने रणनीती ठरवली जाणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भाजपचे पदाधिकारी एकत्रित मिळून मुंबईतील प्रत्यके विधानसभा मतदारसंघाचा एक स्वतंत्र अहवाल तयार करणार आहेत. मतदारसंघातील सध्याच्या भाजपच्या विद्यमान आमदाराची किती लोकप्रियता आहे, मतदारसंघातील विकासकामांची काय परिस्थिती आहे, प्रतिस्पर्धी उमेदवाराला हरविण्यासाठी मतदारसंघातील कोणते मुद्दे परिणामकारक ठरतील, याबाबतची इत्थंभूत माहिती या अहवालात असेल. अहवाल तयार केल्यानंतर मुंबईत कुणाला परत संधी द्यायची; तसेच कुठे नवा चेहरा द्यायचा हे ठरवले जाणार असल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीत मुंबईतील काही मतदारसंघांत मुस्लिम मतांचा सर्वाधिक फटका बसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त हिंदू मतदारांपर्यंत पोहोचून जनजागृती करण्यावर भाजपकडून भर देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघात कानाकोपऱ्यात फिरून माहिती गोळा केली जाईल. मतदारसंघातील झोपडपट्ट्या, चाळी, छोट्या सोसायट्या; तसेच गगनचुंबी इमारती अशी वगवारी करून तिथल्या मतदारांची माहिती गोळा केली जाणार अल्याचे समजते. मतदारसंघातील प्रमुख हिंदू प्रार्थनास्थळे हेरून तिथे कसा प्रचार करता येईल; तसेच त्या माध्यमातून मतदानाच्या दिवशी सर्व हिंदू मतदार कसे मतदानासाठी रस्त्यावर उतरतील, यादृष्टीने या अहवालात ऊहापोह केला जाणार असल्याचे समजते.
Congress vs Shiv Sena : जिथे ठाकरेंचे आमदार, तिथेही काँग्रेसची चाचपणी, मुंबईत १६ जागांसाठी इच्छुक, मातोश्रीच्या अंगणावरही नजर
मतदारांना वळवण्यासाठी प्रयत्न

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुस्लिम मतदार उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बाजूने उभे राहिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. शिवाय उत्तर भारतीय भाजपपासून दुरावले आहेत. ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. भाजपला पक्षाकडे नवे मतदार वळवण्यासाठी काय करावे लागेल, यादृष्टीनेही या अहवालाच्या माध्यमातून चाचपणी करण्यात येणार असल्याचे समजते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.