Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नेमके प्रकरण काय?
प्रकाशा येथील तापी नदीतून नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी २०० कोटीची योजना आणणार असल्याची घोषणा आदिवासी विकाससंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. याच योजनेमुळे नंदुरबारकरांवर अतिरिक्त बोजा चढणारा असून जास्तीची पाणीपट्टी भरावी लागणार आहे त्यामुळे माझा विरोध असल्याबाबत माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी सोशल मिडियात व्हिडिओ टाकून जाहीर केली. यामुळे नंदुरबार मध्ये विधानसभेपूर्वी वातावरण तापले. अशातच अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले याची माहिती देण्यासाठी डॉ. हिना गावित यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळेस डॉक्टर हिना गावित यांनी नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणाजवळ चंद्रकांत रघुवंशी यांच्या फार्म हाऊस असल्याने याच ठिकाणी पाणी भरू नये म्हणून धरणात पूर्ण पाणीसाठा होऊ देत नसल्याचा दावा त्यांनी केला.
याच विधानावर प्रत्युत्तर म्हणून आज माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषद घेतली . यावेळी चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की,नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणासाठी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पैसे दिल्याचे सांगतात मात्र १९९४ मध्ये पदमसिंह पाटील यांनी मंत्री असताना त्याला मंजुरी दिली, त्यावेळी गावित आमदार नव्हती. याच धरणाला डॉक्टर विजयकुमार गावित यांनी प्रचंड विरोध केला होता. डॉक्टर गावित यांनी ज्यावेळी नंदुरबार पालिकेला सहकार्य केले त्यावेळेस त्यांची जाहीर आभार ही मानले. मात्र वीरचक धरणाला पाणी दिल्याचे सांगण्यात येत आहे हे खोटे आहे असे सांगत त्यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यावर विविध आरोप केले असून प्रकाशा येथील तापीतून नंदुरबारसाठी पाणीपुरवठा योजनेला माझ्या विरोध असल्याचे थेट स्पष्ट केले.
डॉ.हिना गावित यांची डिग्री तपासा
चार-पाच दिवसापूर्वी डॉ.हिना गावित धरण बघायला आल्या होत्या की माझा फार्म हाऊस असे सांगत एवढ्या उच्च शिक्षित असूनही माझ्या फॉर्महाऊसमुळे धरण पूर्ण भरले जात नसल्याचा त्यांनी आरोप केला. माझ्या फार्महाऊसमध्ये पाणी भरून नये यासाठी पूर्ण साठा होऊ न देता धरणे अपूर्ण ठेवत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे नंदुरबारकरांना तीन दिवसात पाणीपुरवठा होतो असे त्यांनी सांगितले. मात्र नंदुरबार शहराची पाणीपुरवठा करणारी योजना २०४० पर्यंत लोकसंख्येला गृहीत धरून करण्यात आली आहे. यासाठी नंदुरबार पालिकेचे पूर्ण नियोजन असल्याचे सांगत इतक्या उच्चशिक्षित असूनही डॉक्टर हिना गावित असा आरोप करत असतील तर नंदुरबारच्या हिना गावित पूजा खेडकर आहेत, असे सांगत त्यांची डिग्री तपासण्यात यावी असे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दरम्यान जिल्हा परिषदेतील अधिकारीही डॉक्टर गावित यांच्या दावणीला बांधल्या वागत असल्याचा आरोप चंद्रकांत रघुवंशी यांनी केला असून नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी सावंत कुमार यांची सुद्धा डिग्री तपासावी असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.
डॉ.गवितांनी निधी अडकवला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ – २३, आणि २०२३ – २४ मध्ये नंदुरबार आणि नवापूर पालिकेसाठी निधी मंजूर केला होता. मात्र त्याच्या फाइल्स डॉक्टर गावितांनी दाबुन ठेवल्याने कोट्यवधीचा निधी कालबाह्य झाला. त्यामुळे शहरे विकासापासून वंचित राहिले असे रघुवंशी म्हणाले. डॉ.विजयकुमार गावित यांनी आदिवासी विकास विभागातर्फे नंदुरबार जिल्ह्यात दहा हजार गाईंचे वाटप केले. मात्र १००० लिटर दुधाची जिल्ह्यात वाढ झालेली नाही. वितरित केलेल्या गाईंपैकी किती गाई जिवंत आहेत हेच डॉ.गावित यांनी तपासावे, इतक्या योजना तुम्ही राबवल्या तरीही डॉ.हिना गावित यांचा पराभव का झाला. एक तरी योजना चुकीची आहे किंवा लाभार्थी चुकीचा आहे, तुम्ही तपासले पाहिजे. तुमच्या कर्मामुळे तुमचा पराभव झाला असल्याचा सणसणीत टोला शिंदे शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांनी लगावला आहे.