Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हर्षवर्धन पाटील निवडून तर आले पण केवळ आमदार राहिले नाहीत तर तत्कालीन युती सरकारमध्ये त्यांना मानाचे स्थान मिळाले. जलसंधारण व कृषी राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर हर्षवर्धन पाटलांनी पाठीमागे वळून पाहिलेच नाही. १९९९ ची निवडणूक असेल त्यानंतरची २००४ पर्यंतची निवडणूक असेल हर्षवर्धन पाटील इंदापूर तालुका विकास आघाडीच्या नावाखाली लढले आणि प्रत्येक वेळी विजयी झाले.
महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं स्थानही महत्त्वाचं राहिलं. त्यानंतर हर्षवर्धन पाटलांनी वेळ, काळ आणि सत्तेची गणिते पाहून पुन्हा स्वगृही प्रयत्नचा निर्णय घेतला आणि ते काँग्रेसवासी झाले. हाताचा पंजा हातात घेऊन त्यांनी सन २००९ ची निवडणूक लढवली. सलग २० वर्ष मंत्रिपदी राहिलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी २०१४ मध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली पण त्यात त्यांचा पराभव झाला.
यंदा आपल्याला तिकीट नाही, याचा अंदाज भाऊंच्या कार्यकर्त्यांना आलाय!
मग हर्षवर्धन पाटील सन २०१९ च्या राजकीय परिस्थितीची चाचणी करत त्यांनी भाजपला पसंती दिली आणि ते भाजपमध्ये गेले, मात्र तेथेही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तेव्हापासून या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत आहेत. अर्थात लोकसभेच्या वेळी आमच्याकडून काम करून घेतले जाते आणि आम्हाला विधानसभेला मात्र फसवले जाते, असा समज या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे मध्यंतरी अजित पवारांमुळे लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला अशी चर्चा करत अजित पवारांसोबत युती नको म्हणणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अजित पवार ही आमची गरज असल्याचे जेव्हा सांगितले, तेव्हाच इंदापुरातील भाजपच्या कार्यकर्त्यांना आता आपल्याला उमेदवारी नाही याचा अंदाज आला.
१०० गावांमध्ये शाखा काढण्याचे नियोजन
अद्याप महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय व्हायचा आहे, पण जिंकलेल्या जागा या तत्त्वावर जर वाटप झाले तर इंदापूरची जागा आपल्याला मिळणार नाही, असे गृहीत धरून कार्यकर्त्यांनी आता उशीर नको म्हणून इंदापूर तालुका विकास आघाडीचे निशाण फडकावले आहे. आता हर्षवर्धन पाटील यांना आमचेच ऐकावे लागेल असे हे कार्यकर्ते छाती ठोकपणे सांगू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वीच हर्षवर्धन पाटलांच्या बावड्यात आणि त्यांच्या घरासमोरच या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा सुरू केली. रविवारी याच कार्यकर्त्यांचा पळसदेव येथे मेळावा असून तालुक्यात १०० गावांमध्ये शाखा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. म्हणजेच थोडक्यात एखादी इन्शुरन्स पॉलिसी ज्याप्रमाणे दुसऱ्या कंपनीमध्ये पोर्ट होते, त्याप्रमाणे भाजपकडील कार्यकर्ते विकास आघाडीकडे स्थलांतरित केली जाण्याची शक्यता दाट आहे.
अप्रत्यक्षरित्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेचे समर्थन
अर्थात कार्यकर्त्यांनी ही तयारी केली असतानाच, कार्यकर्ते आणि जनता हाच आमचा श्वास आहे असे सांगत हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या या कार्यकर्त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही, तर त्यांचा पुन्हा एकदा इंदापूर तालुका विकास आघाडीचा नारा पक्का ठरलेला आहे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी मशागत करण्यास सुरूवात केली आहे.