Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Girish Mahajan: संकटमोचक महाजन नाशिकच्या रिंगणात! भाजपच्या जिल्हा कार्यकारणीची आज होणार बैठक

9

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे संकटमोचक तथा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये सक्रिय झाले असून, त्यांच्या उपस्थितीत आज, शनिवारी (दि. ३) भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक होत आहे.

भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक

या बैठकीत शहरातील चारही विधानसभा मतदारसंघ, तसेच एकूणच राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन रणनीती ठरविण्यात येणार आहे. पदाधिकाऱ्यांचेही महाअधिवेशन पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय पक्षांना विधानसभेचे वेध लागले आहेत. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्याने महायुती व महाविकास आघाडीचे घटकपक्ष कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाशिक जिल्ह्यामधील पंधरा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये संवाद यात्रा काढत सहा प्रमुख आमदारांच्या मतदारसंघांमध्ये बैठकी घेतल्या. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे स्थानिक स्तरावर मेळावे सुरू झाले असून, या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने गेल्याच आठवड्यामध्ये महसूलमंत्री विखे-पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संघटनात्मक बैठकी घेतल्या होत्या. त्यानंतर आठच दिवसांमध्ये महाजन यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
Shivsena UBT: जागावाटपाआधीच उमेदवारी; नाशकात ठाकरे गटाकडून दोन उमेदवार जाहीर, ‘मविआ’त ठिणगी पडणार?
यांची प्रमुख उपस्थिती…

गेल्या आठवड्यात भाजपचे प्रभारी व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली होती. आता महाजनही सक्रिय झाले आहेत. या बैठकीस माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, तसेच लोकसभा निवडणूक प्रमुख व माजी आमदार बाळासाहेब सानप, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, नाशिक ग्रामीण दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, नाशिक उत्तर भाजप जिल्हाध्यक्ष शंकर वाघ, भाजपचे ज्येष्ठ नेते विजय साने यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

भूसंपादन वाद शासनदरबारी
नाशिक : महापालिकेतील ५५ कोटींच्या वादग्रस्त भूसंपादनाबाबत आक्षेप असतानाही आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी स्थगिती न दिल्याने भाजपचे आमदार व पदाधिकारी आता आक्रमक झाले असून, त्यांनी थेट शासनदरबारी धाव घेतली आहे. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आज, शनिवारी (दि. ३) नाशिक दौऱ्यावर येत असून, भाजप आमदार याप्रश्नी त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडणार आहेत. विशिष्ट व्यक्तींवर केलेल्या मेहेरबानीची तक्रारही यावेळी केली जाणार आहे. आयुक्त डॉ. करंजकर यांच्या कार्यपद्धतीमुळे शासनाची बदनामी होत आहे. त्यामुळे हे प्रकरण आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत भाजप घेऊन जाणार असल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.