Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
दरम्यान ती मुलगी युट्युबवरील जाकीर नाईक यांचे व्हिडीओ पाहायची. मुलगी आणि शबाना शेख ह्या यांच्या घरी अभ्यास करायला जायची. रात्री उशीरापर्यंत अभ्यास करून कधी कधी त्यांच्याच घरी झोपायची. त्यावेळी शबाना शेख ही इस्लामचे शिक्षण देत होती, असे फिर्यादीमध्ये नमूद केलं आहे. तसेच फिर्यादीच्या मुलीने बुरखा घातलेला फोटो इंस्टाग्रामवर शेजारच्या एका बाईने दाखवला होता. त्यावर मुलीला बुरखा घातलेल्या फोटोबाबत विचारणा केली, त्यावर तिने सहजच तो फोटो काढलेला आहे, असं सांगत मुलीने विषय उडवून लावला होता.
२६ जून २०२२ रोजी डॉ. सपना भिसे यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी त्यांच्यासोबत फिर्यादी ह्या लंडनला गेल्या होत्या. त्या १८ नोव्हेंबर २०२२ रोजी लंडन येथून भारतात परतल्या. तेव्हा मुलीने धर्मांतरण करून मुस्लिम धर्म स्वीकारल्या बाबतचे शाहदत पत्र दाखवत घर सोडून निघून गेली. त्यावर उल्हासनगर आणि अंबरनाथ मस्जीद ट्रस्ट, मुस्लीम जमात असा शिक्का होता. मुलगी ही परत घरी आली नाही म्हणून २९ नोव्हेंबर २०२२ रोजी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे येथे जाऊन दृष्टी हरवली असल्याची तक्रार दाखल केली. तेव्हा मुलीला पोलिसांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे येथे बोलावून घेतले. तिने तिथे मी मुस्लिम धर्म स्वीकारला असल्याचे सांगत घरी आली. त्यावेळी अनिना खान ही फिर्यादी यांच्याजवळ आली. इस्लाम धर्म हा चांगला असल्याचे समजावू लागली. त्यावेळी माझ्या मुलीने जर इस्लाम धर्म स्वीकारला असेल तर तिला रॉकेल टाकून जाळून टाकेन असे अमिना खानला म्हणाल्या. तेव्हा मुलीच्या केसालाही तुम्ही हात लावू शकत नाही, अन्यथा मस्जिदवाले येऊन तुमच्या नाका तोंडातून रक्त काढतील, अशी धमकी अमीना खान हिने दिली.
मुलीने अनेक वेळा फोनवरून संपर्क करून पैशांची मागणी केली. तसेच वडिलांच्या खात्यातून अनेक वेळा रक्कम काढून घेतली. फिर्यादी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलची बुध्दी भ्रष्ट करून तिला कट्टर मुस्लीम बनवले जात आहे. तसेच तिला गैरकृत्यासाठी वापरले जात असल्याचा त्यांना संशय वाटत होता. तसेच दृष्टीकडून ‘काफिर’, ‘जिहाद’ असे शब्द ऐकू येत असल्याने आणि तिच्या हातून समाज विघातक, राष्ट्र विघातक गुन्हे घडू नये म्हणून आणि कुटुंबियांच्या जिवाला धोका होऊ नये म्हणून विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठत गुरुवारी रात्री ,सलीम चौधरी, शबाना शेख, शबाना शेख हिची मुलगी महेक शेख, शबाना शेखची बहिण अमिना, अफिदा खातुन, अफिदा खातुनचा पती वसिम शेख, बाबु दास, काझी इलियाज निजामी, ॲड. कमरूदिदन अन्सारी आणि त्या मुलीवर असे मिळून १० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.