Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जिल्हा नियोजन बैठकीत गोंधळ; सत्तेतील सदस्य आणि आमदारांमध्ये हमरीतुमरी, अप्पर तहसील कार्यालयाचा मुद्दा ऐरणीवर

10

इरफान शेख, सोलापूर : सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी सायंकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हा नियोजन बैठकीत फक्त गोंधळ पाहायला मिळाला. एकनाथ शिंदें शिवसेना गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष काळजे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. खासदार ओमराजे निंबाळकर हे बोलयाला लागल्यावर शिंदें गटाचे मनीष काळजे यांनी खडेबोल सुनावले आणि डीपीडीसीच्या बैठकीत खासदारांना बोलण्याचा अधिकार नाही असे सांगितले.

मोहोळ येथील अप्पर तहसील कार्यालय राजन पाटील यांच्या गावात म्हणजेच अनगर येथे स्थलांतर झाले आहे, तो देखील मुद्दा ऐरणीवर आला. यावरुन अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने यांच्यामुळे मोहोळमधील अप्पर तहसील कार्यालय अनगर गावात गेले, अशा घोषणा देत जिल्हा नियोजन बैठकीत निषेध करत राडा झाला. विशेष म्हणजे सत्तागटातील नेत्यांत खडाजंगी पाहायला मिळाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
Uddhav Thackeray : माझ्या पायाशी कोणीतरी टरबूज ठेवलंय, ढेकनांना आव्हान नसतं, अंगठ्याने चिरडायचं; उद्धव ठाकरेंचा टोला

सत्ता गटातील नेत्यांत आणि आमदारात हमरीतुमरी

मोहोळ तालुक्यातील अप्पर तहसील कार्यालय राजन पाटील यांच्या गावात मंजूर झाल्याने मोहोळमध्ये अनेक दिवसांपासून आंदोलने सुरू आहेत. एकनाथ शिंदे गटाचे चरणराज चवरे आणि मोहोळ तालुक्याचे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांच्यात शाब्दिक चकमक झाली. शाब्दिक चकमक टोकाला जात दोघे हमरीतुमरीवर आले होते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनी अजित पवार गट राष्ट्रवादीच्या आमदारांचा निषेध करण्यात आला.
Mumbai Mhada News : कामाठीपुरात म्हाडा उभारणार ७८ मजली इमारती, काय आहे योजना; वाचा सविस्तर

आमदार यशवंत मानेंना एकेरी भाषेत बोलल्याने प्रचंड गोंधळ

आमदार यशवंत मानेंकडे पाहून एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख या आमदार यशवंत मानेंमुळेच मोहोळमध्ये ही अवस्था झाल्याचा थेट आरोप करत एकेरी उल्लेख केला. आमदार माने यांनी ‘ये चरण’ असे म्हणताच शिवसेना शिंदें गटाचे नेते मनिष काळजे यांनी चवरे यांची बाजू घेऊन माने यांचा निषेध नोंदवला तर तिकडून यशवंत माने यांच्या बाजूने जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांनी चवरे यांना शिंगावर घेतले. यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला, अरे तुरेची भाषा वापरत हमरीतुमरी झाली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.