Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
काय आहे प्रकरण?
मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी ही घटना घडली. डॉ. मयूर बोपचे यांच्याकडे या प्राथमिक आरोग्य केंद्राचा कार्यभार असून डॉ. प्रवीण उमरगेकर हे दुय्यम वैद्यकीय अधिकारी आहेत. शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी डॉ. प्रवीण उमरगेकर कामावर होते. शुक्रवारी सकाळी १०च्या सुमारास मोवाड येथील एका २८ वर्षीय विवाहित महिलेने घरगुती वादावरून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्यावेळी तेथील आरोग्य अधिकारी गैरहजर होते. कर्तव्यावर असलेले डॉ. उमरगेकर त्यांच्या शासकीय निवासस्थानी दारूच्या नशेत तल्लीन अवस्थेत पलंगावर पडले होते, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच डॉ. मयूर बोपचे हेही मुख्यालयी नव्हते. यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला.
घटनेची माहिती मिळताच डॉ. बोपचे यांनी बेलोना येथे आश्रम शाळेतील शिबीरात कार्यरत असलेले डॉ. प्रतीक राऊत यांना संपर्क साधून त्यांना मोवाड येथे जाण्याचे निर्देश दिले. राऊत यांनी मोवाड येथे पोहचून पीडित महिलेवर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर तिला तात्काळ नागपूरला हलवण्यात आले. दुपारी २ वाजताच्या दरम्यान डॉ. प्रवीण उमरगेकर दारूचा प्रभाव कमी झाल्यानंतर हे प्राथमिक आरोग्य केंद्रात आले.
तोपर्यंत गावकऱ्यांनी पोलिस तक्रार केली होती. त्यामुळे नरखेड पोलिसांनी त्यांना नरखेड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करता नेले. जिल्हा परिषदेचे सदस्य समीर उमप यांनी हा मुद्दा शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. यावर संबंधित डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.