Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राज ठाकरे ‘वर्षा’वर, संजय राऊत म्हणतात, सर्व जागा लढण्याची घोषणा केलेली, आता मोठी डील होणार

9

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढवण्याची घोषणा केली होती. आणि आज ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी जात आहेत. कितनी बडी डील हो सकती है, असं सूचक वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटकं सापडल्याचे प्रकरण आणि मनसुख हिरेन खून प्रकरणातील आरोपी आणि माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस स्वतः निवडणूक हरणार आहेत, असा दावाही राऊतांनी केला.

सचिन वाझेवर राऊतांची टीका

अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. याला फडणवीसांनी उत्तर द्यायला हवं, पण उत्तर देण्यासाठी त्यांनी तुरुंगातून प्रवक्ता पाठवला. खून, दहशतवाद यातील एक आरोपी भाजपचा प्रवक्ता म्हणून काम करतोय, असं संजय राऊत म्हणाले.
MVA Dispute : नागपुरातील सहापैकी एकही मतदारसंघ मित्रपक्षांना सोडू नका, काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेने खळबळ
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता यासारख्या विविध विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
Sanjay Raut : देशमुखांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपने तुरुंगातून प्रवक्ता आणला, राऊतांची शेलकी टीका
यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, प्रवक्ते संदीप देशपांडे, अजित अभ्यंकर, वैभव खेडेकर, अभिजित पानसे आणि इतर पदाधिकारीही उपस्थित होते.

राज्य प्रशासनातील मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर सिंह, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव सचिव दीपक कपूर, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर,तसेच गृह विभाग वित्त विभाग, एमएमआरडीए आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.