Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Nagpur Fraud: नांगरे पाटील साहेबांशी बोला, नरेश गोयल प्रकरणात तुमचं नाव आलंय, वृद्धेला घाबरवलं, २३ लाख उकळले

12

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नागरे पाटील यांच्या नावाने सायबर गुन्हेगारांनी ज्येष्ठ महिलेला तब्बल २३ लाखांचा गंडा घातला. या महिलेला एका खोट्या गुन्ह्यात अटक करण्याची धमकी देत भीती दाखवित ही फसवणूक करण्यात आली. काय घडलं नेमकं?

काय आहे प्रकरण?

ममता विलास बनगिनवार (६७, प्रियदर्शिनीनगर) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना १५ जुलै रोजी एक फोन आला. ‘तुमच्या क्रमांकावरून अनेक फसवणुकीच्या घटना झाल्या आहेत. तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे’, असे समोरील व्यक्तीने ममता यांना सांगितले. पुढे त्यांना एक व्हिडीओ कॉलही आला. समोरील व्यक्तीने त्याचे नाव हेमराज कोळी असे सांगितले. तो पोलिसांच्या गणवेशात होता व मुंबईतील टिळकनगर ठाण्यातून बोलत असल्याची त्याने बतावणी केली. नरेश गोयल या आरोपीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात तुमच्या क्रमांकाचाही वापर झाल्याचे त्याने सांगितले. दुसऱ्या दिवशी त्याने परत फोन केला व विश्वास नागरे पाटील बोलतील, असे म्हणत एका अधिकाऱ्याला फोन दिला. त्यावेळी व्हिडीओ बंद झाला होता. या सगळ्या प्रकाराने ममता घाबरल्या व त्यांनी आरोपींच्या खात्यात एकूण २३.२० लाख रुपये जमा केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हे दाखल केलेत.
KYC Fraud: ‘केवायसी’ने केले कर्जबाजारी; माटुंग्यातील इस्टेट एजंटसोबत मोठा स्कॅम, काय घडलं?
मुलाच्या लक्षात आली फसवणूक

आरोपींनी २५ जुलै रोजी ममता यांना सर्वोच्च न्यायालयाच्या नावाने खोटी नोटीसही पाठविली. या प्रकारामुळे ममता घाबरल्या होत्या. त्यांनी चक्क एफडीवर कर्ज काढले व ते पैसे आरोपींना पाठविले . त्यांच्या पतीच्याही खात्याची माहिती आरोपींनी मागविली . त्यांनी तीसुद्धा दिली. त्यांचे पती विलास यांच्या पीपीएफ खात्यातून १० लाख रुपये काढून ते आरोपींना पाठविण्यात आले. याचा मेसेज ममता यांचा मुलगा प्रथमेशच्या मोबाइलवर गेला. त्यानंतर त्याने सर्व प्रकार जाणून घेतला व आपली फसवणूक झाल्याचे त्याने आईला सांगितले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.