Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra Police: अरे मैं तो साहब बन गया…सूट मेरा देखो…! राज्यात ६१० अंमलदारांना पदोन्नती, नाशिकचे १००हून अधिक कर्मचारी
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : सन २०१३ मध्ये खात्यांतर्गत उपनिरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पोलिस अंमलदारांना तब्बल अकरा वर्षांनंतर अधिकारी पदावर नियुक्त करण्याचे आदेश आस्थापना विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांनी जारी केले आहेत. त्यानुसार राज्यातील ६१०, तर नाशिकमधील शंभरपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. या नवनियुक्त अधिकाऱ्यांचे सध्याचे कामकाज पूर्ण करून बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्याचे आदेश सर्व पोलिस घटकांना देण्यात आले आहेत.
६१० अंमलदारांना पदोन्नती
अकरा वर्षांनंतरही अधिकारीपदाच्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात ‘मटा’ने वारंवार पाठपुरावा केला आहे. जून २०२४ मध्ये यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पुढील कार्यवाहीला वेग आला. त्यानुसार १ जुलै रोजी रात्री उशिराने संबंधित कर्मचाऱ्यांच्या अधिकारीपदी बढतीसह नियुक्तीचे आदेश जारी झाले. त्यानुसार नाशिक शहरचे फिरोजखान पठाण व ज्ञानदेव राणे यांची नाशिक शहर आयुक्तालयात नियुक्ती झाली आहे. तर नाशिक शहरचे सुनील अहिरे, नंदू उगले, श्रावण केदार व नाशिक ग्रामीणचे किशोर दळवी यांची राज्य महिला सुरक्षा पथकात नियुक्ती केली आहे. नाशिक शहरचे रवींद्र ठोके, राजेश सावकार, वाल्मीक खैरनार, लोहमार्ग मुंबई, संतोष पवार, सतीश पवार, संतोष चव्हाण, दगू गांगुर्डे, सुनील पवार यांच्यासह नाशिक ग्रामीणचे देवीदास लाड मुंबई शहर, ज्ञानदेव शिरोळेंची कोकण परिक्षेत्रात नियुक्ती केली. नंदकिशोर जाधवांची पुणे शहर, देवीदास फडांची पिंपरी चिंचवड, राजेंद्र जगताप, धर्मा पारधी, कैलास गर्जे, संजय ढुमसे, विजय जाधव, संजय बागूल यांची लोहमार्ग मुंबई तर प्रभाकर पवार नवी मुंबईत नियुक्ती केली आहे.
नाशिकचे शंभरहून अधिक कर्मचारी
– सन २०१३मध्ये उपनिरीक्षकपदासाठी राज्यभरात खात्यांतर्गत परीक्षा झाली. त्यानंतर न्यायालयात दावा दाखल झाला.
– १६ ऑक्टोबर २०२३ मध्ये सेवाज्येष्ठतेनुसार १ हजार ४८८ अंमलदारांची माहिती मागविण्यात आली. त्यापैकी ६६० परीक्षा उत्तीर्ण अंमलदारांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली.
– २९ डिसेंबर २०२३ रोजी पदोन्नतीसाठी पदस्थापनेकरिता संवर्ग मागण्यात आले.
– मार्च २०२४ पूर्वीही घटक निश्चिती करण्यात आली. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे संबंधित उपनिरीक्षकांची नियुक्ती रखडली होती.
– निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या मोजक्या कर्मचाऱ्यांना उपनिरीक्षकपदी बढती मिळाली होती.