Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शीव रेल्वे उड्डाणपुलाची पुनर्बांधणी, खडकवासला धरणसाखळीतील धरणे भरली, सकाळच्या दहा हेडलाईन्स

10

१. शीव रेल्वे उड्डाणपुलाचे पाडकाम सुरू झाल्यावर पुलाची पुनर्बांधणी आणि नव्या मार्गिका केव्हा सुरू होणार, अशा मुंबईकरांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मध्य रेल्वेने पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत 6 परळ ते कुर्लादरम्यान पाचवी-सहावी मार्गिका येत्या तीन वर्षांत अर्थात २०२७पर्यंत सुरू होणार असल्याची माहिती शनिवारी देण्यात आली. बातमी वाचा सविस्तर…
२. खडकवासला धरणसाखळीतील सर्व धरणे भरली आहेत. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात २७ हजार १६ क्युसेक्स, मुळशी धरणातूनही मुळा नदीपात्रात २७ हजार ६०९ क्युसेक्स आणि पवना धरणातून पाच हजार क्यूकेक्सने विसर्ग करण्यात आला आहे.

३. ‘सचिन वाझे मला कधी भेटले नाहीत. त्या बाइटमध्ये पत्रकार खोदून विचारतो, मग ते उत्तर देतात. आजकाल तुरुंगात असणाऱ्या माणसांच्या मुलाखती होत आहेत. त्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत. त्यांना उत्तर मला आवश्यकता वाटत नाही,’ असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले. बातमी वाचा सविस्तर…

४. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती व राज्यातील सर्वात मोठा दूध प्रक्रियेचा ब्रँड असलेल्या सोनाईचे संचालक प्रवीण माने यांनी शरद पवारांची तुतारी हातात घेतली. प्रवीण माने यांच्या पक्षातील येण्याने पक्ष बळकट झाला असला, तरी अनेक प्रश्न देखील जोडीला निर्माण झाले आहेत.

५. मुंबईत होणारे हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प, मुदत ठेवींच्या शिलकीमध्ये झालेली घट यामुळे मुंबई महापालिका महसूलवाढीसाठी प्रयत्न करत असतानाच मुंबई महापालिकेला राज्य सरकारकडून सुमारे ९ हजार ६७५ कोटी रुपये येणे आहेत. महापालिकेतर्फे मुंबईत मोठ्या प्रमाणात विकासकामे होत असून ही थकबाकी मिळाल्यास महापालिकेच्या विविध प्रकल्पांना गती मिळेल.

६. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील मालू कापड दुकान पेट्रोल बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार असलेल्या मुख्य आरोपीस अखेर एका महिन्याने नागपूर येथून अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. सुरज गुप्ता (वय ३१) असं आरोपीचं नाव आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मालू कापड दुकानात आरोपी सूरज गुप्ता याने पेट्रोल बॉम्ब टाकला होता.

७. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणा जवळ असलेल्या पीर बाबाचे दर्शन घेऊन आले. त्यानंतर पाण्यात खेळण्यासाठी उतरलेल्या ३ बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना काल शनिवारी सायंकाळी पावणेपाच वाजता घडली. दोन जण पाण्यात उतरले नसल्याने ते बचावले.

८. गडचिरोलीतील कोरची तालुक्यातील चर्विदंड येथील एका गर्भवती महिलेला प्रसूतीकळा आल्याने तिला खाटेचा कावड करून दोन किलोमीटर पायपीट करण्याची नामुष्की गावकऱ्यावर ओढवली. रोशनी शामराव कमरो (वय २३) असे त्या गर्भवती महिलेचं नाव आहे. बातमी वाचा सविस्तर…

९. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांची जोडी एकेकाळी बॉलिवूडमधील आदर्श जोडप्यांपैकी एक होती. पण दोघांनी वेगळे झाल्याची घोषणा केली तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मलायका आणि अरबाज आता एकत्र नसले, तरी त्यांची प्रेमकहाणी आजही लोकांना आठवते.

१०. ‘न्यायालयीन प्रक्रियेमुळे लोक इतके विटले आहेत की, त्यांना केवळ तोडगा हवा आहे. न्यायालयापासून दूर राहू दे, असे त्यांना वाटते’, असे प्रतिपादन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी शनिवारी केले. यावेळी पर्यायी वाद निवारण यंत्रणा म्हणून लोकअदालतींची भूमिका त्यांनी अधोरेखित केली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.