Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुढील २४ तास धो-धो, पुणे-पालघरला रेड अलर्ट, मुंबईत मुसळधार, वाचा Weather Report

11

मुंबई: राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला असून कालपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. तर पुणे, ठाणे, नाशकातही पावसाची कोसळधार सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पुणे, पालगर आणि सातारा जिल्ह्याला पावासाचा रेड अलर्ट दिला आहे. तर, मुंबई, ठाणे, विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यादरम्यान, परिसरात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर, पुढील पाच दिवस राज्यात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

२४ तास महत्त्वाचे

राज्यासाठी पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, पुढील पाच दिवस राज्यात असाच पाऊस राहणार असल्याची शक्यता आहे. आज मुंबईसह उपनगरात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी ५५ ते ६५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत.
Pune Rain: पुणेकरांनो सावधान! पावसाचा रेड अलर्ट, खडकवालातून विसर्ग वाढवणार

पुणे, साताऱ्याला रेड अलर्ट

हवामान विभागाने पुणे, पालघर आणि साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तर मुंबई, ठाणे, विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोल्हापूर, नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नाशकात पावसाची संततधार, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

नाशकातही पावसाची संततधार सुरु आहे. पावसामुळे गोदावारीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नाशिक शहरात गेल्या २४ तासात ७५.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर नाशकात आजही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मराठवाड्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. विभागातील एकूण ८७७ प्रकल्पांत २१.३४ टक्के पाणीसाठा आहे. जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू झाली असून, शनिवारी सायंकाळपर्यंत पाणीसाठा १०.१२ टक्क्यांवर पोहचला होता. धरणाची पाणीपातळी तीन फुटांनी वाढली आहे.

मराठवाड्यातही जोरदार पाऊस

मराठवाड्यात संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात पावसाचा जोर कमी आहे. मात्र, इतर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर असल्यामुळे धरणसाठ्यात वाढ झाली आहे. विभागातील मोठ्या ११ धरणांत १७.५९ टक्के पाणीसाठा आहे. ७५ मध्यम प्रकल्पात २६.९३, ७४९ लघु प्रकल्पात २४.६९, गोदावरी नदीवरील १५ प्रकल्पात ३८.५७ टक्के आणि तेरणा, रेणा आणि मांजरा नदीवरील २७ प्रकल्पात ५५ टक्के पाणीसाठा आहे. एकूण ८७७ प्रकल्पात २१.३४ टक्के पाणीसाठा आहे. जायकवाडी धरणात १०.१२ टक्के पाणीसाठा झाला आहे. सिद्धेश्वर ३५, मांजरा २, उर्ध्व पेनगंगा ४९, निम्न तेरणा २८, निम्न मनार ६३, विष्णुपुरी ८५, निम्न दुधना १० असा धरणनिहाय पाणीसाठा आहे. माजलगाव आणि सिना कोळेगाव धरणात पाणी शिल्लक नाही.

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जुलै, ऑगस्ट महिन्यात सलग आठवडाभर पावसाने दमदार हजेरी लावल्याने वरचे लहान-मोठे बंधारे, धरणं भरली आहेत. नागमठाण बंधाऱ्यातून शनिवारी संध्याकाळी सहाच्या दरम्यान सात हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली आहे. धरणात पाणी पातळीत तीन फुटाने वाढ झाली असल्याची माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाचा नियंत्रण कक्षामधून देण्यात आली. नाशिक जिल्हातील इगतपुरीसह परिसरातील पावसाने दमदार हजेरी लावल्याने दारणा धरणामधून १९ हजार ९७२, भावली १८२१, कडवा ५२९८, नागमठाण केटीवेअर १८९३०, भाम ५९२०, पालखेड २३४५ असा विसर्ग सुरू आहे. या धरणांमधून प्रसिसेकंद सात हजार क्युसेक वेगाने गोदावरी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाचे पाणी मिळून पाण्याचा आवक वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती माहिती पूरपूर्व अनुमान सरीमापण कक्ष विभागाचे नियंत्रक गणेश कराडकर यांनी ‘मटा’शी बोलताना दिली आहे. १५२२ फूट जल साठवण असलेल्या जायकवाडी धरणामध्ये १०.१२ टक्के जलसाठा आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.