Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गटारीची पार्टी पडली महागात, कारसह पाच मित्र पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले, अन् मग…

11

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा धरण क्षेत्रात गटारी निमित्त दारू पार्टी करणे मित्रांच्या जीवावर बेतल्याची खळबळकनक घटना समोर आली आहे. पाच मित्र कारमध्ये बसून धरणाचा मुख्य प्रवाह असलेल्या गेटजवळ गटारीची पार्टी करत होते. त्याच सुमाराला अचानक तानसा धरणाचे स्वयंचलित २४ दरवाजे उघडले आणि नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाला. या प्रवाहात हे पाचही मित्र कारसह नदीच्या प्रवाहात वाहून जाऊ लागले. त्यापैकी एकाच मृतदेह नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला आहे. तर, दुसरा बेपत्ता झाला आहे. यावेळी तीन मित्रांनी कारमधून उड्या मारून आपला जीव वाचवला आहे. गणपत चिमाजी शेलकंदे (रा.कल्याण) असे या दुघटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने त्यातच श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी गटारी साजरी करण्यासाठी हजरो पर्यटक निर्सगाच्या सानिध्यात पार्टीसाठी येत असतात. त्यात कल्याणहून शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात गटारीची पार्टी साजरी करण्यासाठी पाच जण कारने गेले होते. हे मित्र ३ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास पार्टी करण्यासाठी तानसा धरणाच्या गेट नंबर एकच्या खाली कारमध्ये बसून पार्टी करत होते.
Rain Alert: पुढील २४ तास धो-धो, पुणे-पालघरला रेड अलर्ट, मुंबईत मुसळधार, वाचा Weather Report
तेवढ्यात अचानक तानसा धरणाचे स्वयंचलित २४ दरवाजे उघडल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आणि हे पाच जण कारसह नदीच्या प्रवाहात वाहून जाऊ लागले. यापैकी तिघांनी कार बाहेर उड्या मारल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र, दोनजण गाडीत अडकले होते. यापैकी गणपत चिमाजी शेलकंदे यांचा कारमध्ये गुदमरून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, एकजण आद्यपही बेपत्ता असून याचा शोध सुरू आहे.

दरम्यान, पावसाळ्यात धरण, तलाव, नदी, धबधबे, या ठिकाणी पर्यटकांना पिकनिकसाठी जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून बंदी घालती आहे. तरी सुद्धा काही पर्यटक जीव धोक्यात घालून अशा ठिकाणी पार्टीसाठी जात असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे गेल्या आठ दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणातून पाण्याचा विर्सग मोठ्या प्रमाण सुरू आहे. यामुळे नदी काठच्या ग्रामस्थांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला असताना काही अतिउत्साही पर्यटक मात्र धरण, धबधब्यांच्या ठिकाणी जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालताना दिसत आहेत. या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.