Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ज्येष्ठ गांधीवादी समाजसेविका शोभना रानडे यांचं निधन, वयाच्या ९९ वर्षी घेतला शेवटचा श्वास

11

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या, निराधार महिला आणि मुलांसाठी सातत्यपूर्ण कार्य करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका शोभना रानडे (वय ९९) यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी केंद्र सरकारने रानडे यांना २०११ मध्ये पद्मभूषण किताबाने सन्मानित केले होते. शोभना रानडे यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९२४ रोजी पुण्यात झाला. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांची आगाखान पॅलेस येथे महात्मा गांधी यांच्याशी भेट झाली. या भेटीनंतर रानडे यांनी आयुष्यभर गांधीवादी आदर्श स्वीकारले.आसाममधील उत्तर लखीमपूर येथे १९५५ मध्ये त्या विनोबा भावे यांच्यासमवेत पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. मैत्रेयी आश्रम आणि शिशु निकेतनमधील पहिले बाल कल्याण केंद्र स्थापन करण्यात त्यांनी मदत केली. रानडे यांचे जीवन निराधार स्त्रिया आणि बालकांसाठी समर्पित होते. नागा महिलांना चरखा विणण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी रानडे यांनी आदिम जाति सेवा संघ ही मोहीम सुरू केली. पुढे १९७९ मध्ये पुण्यात परतल्यानंतर आगाखान पॅलेस मध्ये त्यांनी गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीच्या नेतृत्वाखाली १९९८ मध्ये कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग विद्यालय ही निराधार महिलांसाठी संस्था सुरू केली. आजही या संस्थेद्वारे महिलांना व्यापार आणि कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय सासवडमध्ये त्यांनी बालकल्याण प्रकल्प सुरू केला.
IND vs SL यांच्यातील दुसऱ्या वनडेमध्ये फिरकीपटू पुन्हा वर्चस्व गाजवतील की फलंदाजांना संधी मिळेल?

शोभना रानडे या कस्तुरबा गांधी नॅशनल मेमोरियल ट्रस्ट, गांधी स्मारक निधी, बालग्राम महाराष्ट्रच्या विश्वस्त, गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीच्या सचिव, अखिल भारतीय महिला निरक्षरता निर्मूलन समिती, अखिल भारतीय महिला परिषद आणि भूदान ग्राम दान मंडळ महाराष्ट्र या संस्थेच्या अध्यक्ष होत्या. गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीच्या माध्यमातून त्यांचा गंगा वाचवा चळवळ , गंगा नदीला प्रदूषणापासून वाचवण्याच्या मोहिमांमध्येही सक्रीय सहभाग होता.

शोभना रानडे यांच्या व्यापक कार्याची दखल घेऊन विविध नामांकित संस्थांनी त्यांचा सन्मान केला. रानडे यांना जमनालाल बजाज पुरस्कार, रवींद्रनाथ टागोर पुरस्कार, राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार, प्राईड ऑफ पुणे पुरस्कार, बाल कल्याण कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार महात्मा गांधी पुरस्कार यांसह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.