Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Mumbai Manhole: मुंबईतील मॅनहोलवर पुन्हा ‘सायरन’; अलर्ट देणाऱ्या यंत्रणेच्या चाचण्यांना सुरुवात

9

मुंबई : मॅनहोलमधील झाकणे चोरीला जाण्याच्या घटना मुंबईत घडत असताना. मॅनहोलमधून पाणी ओव्हरफ्लो होण्याचे प्रकारही निदर्शनास येतात. हे रोखण्यासाठी ‘सायरन’ची उपाययोजना पुढे आली होती. अॅलर्ट देणारी ही यंत्रणा १४ ठिकाणी बसवून त्याच्या चाचण्याही घेण्यात आल्या. परंतु तांत्रिक अडचणींमुळे ही यंत्रणा न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पुन्हा या यंत्रणेचा सायरन वाजू लागला आहे. मुंबई महापालिकेच्या मलनि:सारण विभागाने नव्याने चाचण्यांना सुरुवात केली आहे.

आताच्या चाचण्यांमध्ये नवी अद्ययावत यंत्रणा वापरली जात असून हा प्रयोग सध्या मुंबई महापालिकेच्या बी आणि डी वॉर्डमध्ये सुरू आहे, अशी माहिती महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी झालेल्या सुनावणीदरम्यान उघड्या मॅनहोलसंदर्भात मुंबई महापालिकेला खडे बोल सुनावले होते. त्यानंतर मॅनहोलची झाकणे चोरीला जाऊ नयेत, यासाठी अॅलर्ट देणारी सायरन यंत्रणा बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. एका कंपनीमार्फत मुंबईतील १४ ठिकाणी मॅनहोलच्या झाकणाखाली ही यंत्रणा बसवण्यात आली. जानेवारी २०२३पासून चाचण्यांना सुरुवात केली. ही यंत्रणा महापालिकेच्या भायखळा येथील नियंत्रण कक्षाला जोडलेली होती.

या यंत्रणेत प्रकार होते. झाकणेचोरीचा प्रयत्न करताना सूचना देणारी यंत्रणा १० ठिकाणी, तर झाकणेचोरीसह पाणी ओव्हरफ्लो होताच अॅलर्ट देणारी एकत्रित यंत्रणा चार ठिकाणी बसवण्यात आली होती. यंत्रणेतील सॉफ्टवेअरचे काम, सॉफ्टवेअरमार्फत नियंत्रण कक्षाशी साधण्यात येणारा संपर्क, याबाबत अनेक चाचण्या घेण्यात आल्या. परंतु त्यात यश मिळत नव्हते. मुंबईसारख्या ठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचते, त्यामुळे ही यंत्रणा कितपत यशस्वी ठरेल, असाही प्रश्न होता. अखेर मार्च २०२४मध्ये चाचण्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र हा प्रयोग करण्यासाठी महापालिकेकडे आता काही कंपन्यांनी पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर केले आहेत. यातील दोन कंपन्यांना चाचण्या घेण्यासाठी परवानगी दिली आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
सावधान… राज्यात डेंगी, चिकुनगुनियाने काढले डोके वर; चिंताजनक आकडेवारी समोर
महापालिकेच्या सॅण्डहर्स्ट रोड या बी वॉर्डमध्ये आणि गिरगाव, ग्रॅण्ट रोड परिसर असलेल्या डी वॉर्डमध्ये एक ते दोन मॅनहोलवर चाचण्या करण्यात येत आहेत. यामध्ये सायरन वाजून अॅलर्ट देणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे. या चाचण्या काही दिवस सुरू राहतील. त्या यशस्वी झाल्या, तरच त्या मुंबईतील मॅनहोलवर बसवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. यामध्ये काही उपकरणे आणि त्याला आवश्यक सेन्सर नवे व अत्याधुनिक आहेत.

येथे प्रयोग अपयशी


वरळीतील बीडीडी चाळ, बाळूशेठ मादुरकर मार्ग, परळमधील जेरबाई वाडिया मार्ग, शिवडी क्रॉस रोड, येथीलच डी. जी. महाजनी मार्ग, ग्रॅण्ड रोडमधील त्रिंबक परशुराम लेन, येथील एम. एस. अली रोड, तुळशीवाडीमधील भानजीभाई राठोड मार्ग, दादरमधील बापूराव परुळेकर मार्ग

येथे आता प्रयोग

बी वॉर्ड – सॅण्डहर्स्ट रोड
डी वॉर्ड – गिरगाव, ग्रॅण्ट रोड

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.