Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नगरच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वांधार, भंडारदरा तांत्रिकदृष्या भरले, रंधा धबधबाही प्रवाहित

6

अहमदनगर : पुणे, मुंबई, नाशिकसारख्या शहरांत पावसाचा कहर सुरू असतानाच डोंगर दऱ्या आणि धरणांच्या पाणलोटातही पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात घाटघर, रतनवाडी, पांजरेसह भंडारदरा, मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे भंदारदरा धरण तांत्रिकदृष्टया भरल आहे. प्रवरा नदी पात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असून पर्यटकांचे आकर्षण ठरणारा रंधा धबधबाही कोसळू लागला आहे. रविवारी सकाळी भंडारदरा धरणातून २८ हजार २४४ क्युसेक तर निळवंडे धरणातून २३ हजार ४९१ क्युसेक विसर्ग प्रवरा नदीत होता. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

अहमदनगरच्या मुळा, भंडारदरा, निळवंडे धरणाच्या पाणलोटातील घाटघर, पांजरे, रतनवाडी, वाकी, हरिचंद्रगड, कळसुबाई शिखर परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. दोन दिवसांपासून या भागात जोर वाढला आहे. शनिवारी दिवसरभर जोरदार पाऊस झाला. गेल्या चोवीस तासांत यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. गेल्या चोवीस तासांत घाटघरला ४७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर रतनवाडी ४४९, पांजरे ४४५ भंडारदरा २४५ निळवंडे ११६ तर अकोल्यात १७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ११ टीएमसी क्षमतेचे भंडारदरा धरण तांत्रिंकदृष्ट्या भरल्याचे करण्यात आले आहे. धरणात ९५ टक्के पाणीसाठा नियंत्रित ठेवून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे.
Rain Alert: पुढील २४ तास धो-धो, पुणे-पालघरला रेड अलर्ट, मुंबईत मुसळधार, वाचा Weather Report
आज सकाळपासून जोरदार पावसामुळे भंडारदरा धरणात पाण्याची विक्रमी आवक होत आहे. त्यामुळे टप्प्याने विसर्ग वाढविण्यात येत आहे. भंडारदरा धरणातील पाणी निळवंडे धरणात येत असल्याने तेथे गेल्या दोन दिवसात दोन टीएमसी पाणी जमा झाले. निळवंडे धरण ८२ टक्के भरले आहे. त्यामुळे निळवंडेतूनही २१ हजार ८५५ क्युसेक विसर्ग सुरु आहे. पुढे हेच पाणी ओझर बंधाऱ्यात येते. ओधर बंधाऱ्यातूनही विसर्ग सुरु केल्याने भंडारदरा, निळवंडेतून पाणी थेट जायकवाडीकडे जायला सुरुवात झाली आहे. अद्याप रिकामेच असलेल्या जायकवाडी धरणाकडे प्रवरा आणि गोदावरी नदीतूनही पाणी जाऊ लागल्याने मराठवाड्यासाठी दिलासादायक ठरणार आहे.
Krushi Udan Yojana: शेतीमालाचे उड्डाण हवेतच, जागतिक बाजारपेठेपासून शेतकरी वंचित
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. हरिचंद्रगड परिसरातील पावसामुळे मुळा धऱणातही वेगाने पाणी जमा होत आहे. रविवारी सकाळी मुळा धऱणात ७१ टक्के पाणीसाठा झाला. मुळा नदीलाही पूर आल्याने नदीतून धरणात ४१ हजार क्युसेक वेगाने पाणी वाहत आहे. मुळा आणि प्रवरा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नाशिकमध्ये पाऊस सुरू असल्याने गोदावरीही दुथडी भरून वाहत आहे. नांदुर मधमेश्वर बंधाऱ्यातूनही ४४ हजारर ७६८ क्युसेक विसर्ग सुरु आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.