Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गोरेगावमधील दाम्पत्याच्या मृत्यूचं गूढ, बिग बॉसच्या घरात कोण उगवतंय सूड? सकाळच्या दहा हेडलाईन्स

8

१. लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार, महायुतीने विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली, महिला मतदारांवर विशेष लक्ष केंद्रीत, लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं श्रावणाच्या पवित्र महिन्यात अनोखं अभियान, इथे क्लिक करुन वाचा सविस्तर

२. माळीण गाव परिसरातील गावांना धोका, पांचाळे खुर्द या गावामध्ये सात ते आठ फूट जमीन खाली गाडली गेली, माळीण घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती, पुनर्वसन करण्याची ग्रामस्थांची मागणी

३. कालसर्प योगाची पूजा करताना राम कुंडाजवळ पाय घसरला, ओझरचा २९ वर्षीय इंजिनिअर तरुण गोदावरी नदीत वाहून गेला, नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढला, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी

४. पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या, मुलाचा गोंधळ उडू नये म्हणून किशोर पेडणेकर यांनी घेतलेली खास काळजी, नातेवाईकाला केलेला शेवटचा मेसेज देणार कलाटणी, इथे क्लिक करुन जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

५. श्रावण सुरु होण्याआधी गटारीच्या निमित्ताने ओली पार्टी, ठाण्यात रविवारच्या दिवशी तळीरामांकडून दंड वसुली, ४७ मद्यपींसह वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या एकूण ४४३ वाहन चालकांवर ठाणे वाहतूक शाखेची कारवाई, चार लाख ५९ हजाराचा दंडही वसूल

६. आयकर रिटर्न फायलिंगची शेवटची तारीख संपली, आता परतावा जारी करण्यासाठी प्राप्तिकर विभागाची लगबग, आयटीआर ई-व्हेरिफाय केले नसल्यास परताव्यासाठी प्रतीक्षा लांबणीवर

७. ठरलं तर मग मालिकेत प्रतिमा पुन्हा नटल, लेकीचं रुप पाहून पूर्णा आईच्या डोळ्यात आनंदाश्रू, पण मंगळसूत्र घालण्यास ठाम नकार, रविराजची हतबलता, तर दागिने हातचे गेल्यामुळे प्रियाचा सायलीवर राग, रविराजने सायलीला सर ऐवजी काका बोलण्यास सांगितल्याने जळफळाट

८. माझ्यासमोर शहाणपणा करायचा नाही, तुला घराबाहेर कसं काढायचं ते मी बघते, बिग बॉस मराठीच्या घरात अभिनेत्री जान्हवी किल्लेदारची गुलिगत धोका फेम सुरज चव्हाणला धमकी, तू निघ… चल फूट, सुरजचं तोडीस तोड उत्तर

९. इस्रायलने गाझा पट्टीवरील केलेले हल्ले तीव्र, रविवारी सकाळी केलेल्या हवाई हल्ल्यात गाझातील १८ नागरिक मृत्युमुखी, पॅलेस्टिनी हल्लेखोराने इस्रायलच्या तेल अविवमध्ये केलेल्या चाकू हल्ल्यात दोन नागरिकांची मृत्यू

१०. पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये नोआ लायल्यसी सुवर्ण कामगिरी, पुरुषांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रचला इतिहास, ९.७९ सेकंदात फिनिश लाईन पूर्ण करत उल्लेखनीय फरकाने विजय

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.