Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुलाची मेहनत, वडिलांचं प्रोत्साहन, बाप अन् लेक एकाच दिवशी PSI

9

अजय गर्दे, धुळे : धुळे येथील पानपाटील कुटुंबासाठी ऑगस्टची सुरवात एका आनंदाच्या गोष्टीने झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलिस उपनिरीक्षक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत रोहन पानपाटील त्यांच्या संवर्गातून ३५व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. १ ऑगस्टला सायंकाळी तो आनंद साजरा करत असतानाच रोहनचे वडील तथा सहाय्यक उपनिरीक्षक गुरुदत्त पानपाटील यांनी २०१३ मध्ये खातेअंतर्गत दिलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर होऊन त्यांचीही पोलिस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याची वार्ता आली अन् पानपाटील यांच्या घरी शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ लागली.अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या रोहनचे प्राथमिक शिक्षण पिंपळनेर (ता. साक्री) येथील आ. मा. पाटील विद्यालय, तर माध्यमिक शिक्षण साक्री येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्याने इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशनची पदवी मिळवली. बालपणापासूनच वडिलांच्या खाकी वर्दीचे त्याला विशेष आकर्षण होते. स्पर्धा परीक्षांकडे त्याचा कल असल्याचे पाहून वडिलांनीही त्याला प्रोत्साहन दिले अन् त्यामुळे तो या परीक्षेच्या तयारीला लागला.
Shivaji Kardile : पैलवानांचा १२ महिने व्यायाम, मीही एकामागून एक निवडणुका लढवतो, पाचपुतेंच्या श्रीगोंद्यात कर्डिलेंचा शड्डू?

संस्थांची अनमोल साथ

येथील आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये आमदार अमरिशभाई पटेल व माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्रीमती केतकीबेन पटेल सेंट्रल लायब्ररीमध्ये रोहनने नियमित स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी साकारलेल्या किसान विद्याप्रसारक संस्थेच्या (कै.) विश्वासराव रंधे क्रीडासंकुलाच्या क्रीडांगणावर त्याने शारीरिक चाचण्यांचा कठोर सराव केला.

११ वर्षांची प्रतीक्षा संपली

रोहनचे वडील गुरुदत्त पानपाटील १९९१ मध्ये पोलिस दलात दाखल झाले. त्यांनी ३३ वर्ष सेवा बजावली आहे. २०१३ मध्ये त्यांनी पोलिस खात्यांतर्गत ‘एमपीएससी’तर्फे घेण्यात आलेली पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. मात्र तब्बल ११ वर्षांनी त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी करण्यात आला. ते सध्या येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात वाचक शाखेत सहाय्यक उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.

वरिष्ठांकडून कौतुक

पिता-पुत्राला एकाच दिवशी पोलिस उपनिरीक्षकपदाची संधी मिळाल्याबद्दल पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी भागवत सोनवणे यांनी कौतुक केले. हा दुग्धशर्करा योग असल्याची प्रतिक्रिया श्री. धिवरे यांनी व्यक्त केली.

“आजवर घेतलेल्या परिश्रमांचे चीज झाले. मुलास अधिकारी होण्यासाठी कायमच प्रोत्साहन दिले. त्याने माझा विश्वास सार्थ ठरवला. मी पदावर, तर मुलगा प्रशिक्षणासाठी रवाना होत असल्याचा योगही जुळून आला. या यशात पत्नी सौ. ममता हिचा खूप मोठा वाटा आहे. वरिष्ठांकडून येथील संस्थांकडून नेहमीच साथ आणि सहकार्य लाभले. मुलाने आदर्श अधिकारी व्हावे हीच अपेक्षा आहे.” गुरुदत्त पानपाटील, वडील “बालपणापासून पोलिस सेवेचे आकर्षण होते. वडिलांनी त्याबाबत नेहमीच प्रोत्साहन दिले. नियोजनबद्ध वेळापत्रक तयार करून अभ्यास केला. शिरपूरला उत्तम दर्जाचे अध्ययन अन् मैदानी सरावाची सुविधा खूप मोलाची ठरली. वडिलांना व मला एकाच दिवशी उपनिरीक्षक पदाची संधी मिळाली, हा माझ्यासह कुटुंबासाठी अविस्मरणीय क्षण आहे”, असं रोहनचे वडील म्हणाले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.