Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राज्यातील सर्वात पहिला गणपती आगमन सोहळा उत्साहात साजरा

12

कोल्हापूर : मुंबईच्या लालबागच्या राजाच्या प्रतिकृतीचे दर्शन पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातील भाविकांना घेता यावे. यासाठी रंकाळा स्टॅन्ड येथील रंकाळवेस गोल सर्कल मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने गेल्या १२ वर्षांपासून लालबागच्या राजाच्या रूपातील गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत असते. ही मूर्ती मुंबई येथून कोल्हापुरात आणली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील कोल्हापूरच्या राजाचे आगमन ढोल ताशाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आले. विशेष म्हणजे हा राज्यातील सर्वात पहिला गणपती आगमन सोहळा असतो. कोल्हापूरच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी हजारो कोल्हापूरकर दुपार पासूनच तावडे हॉटेल चौकात जमले होते. यामुळे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.रंकाळवेश गोल सर्कल मित्रमंडळाचे हे यंदाचे १२वे वर्ष आहे. लालबागच्या राजाचे मूर्तिकार संतोष रत्नाकर कांबळी यांनी ही मूर्ती बनवली आहे. ही मूर्ती प्रभावळीसह १४ फूट उंच आहे. लालबाग येथील गणेश कार्यशाळेतून ही मूर्ती रविवारी सायंकाळी साडेसात वाजता तावडे हॉटेल चौकात आली. तेथे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. ढोल-ताशा पथक, विद्युत रोषणाईत गणेशमूर्ती शहरात आणण्यात आली. गणेश चतुर्थीला मूर्ती मंडपात विराजमान होते.
MNS Vidhan Sabha Candidates : राज ठाकरेंचा स्वबळाचा आवाज घट्ट, मनसेचे दोन उमेदवार जाहीर, थेट भाजपच्या मतदारसंघातच पहिला धमाका

या गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्याला दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यामुळे यंदा देखील पोलिसांचा चार वाजल्यापासूनच तावडे हॉटेल परिसरात कडक बंदोबस्त होता. डी.वाय.एसपी. सुजीत क्षीरसागर, अजित टिके यांच्यासह २० पोलिस अधिकारी आणि २०० पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्ताला होता. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मूर्ती तावडे हॉटेलजवळ आल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ढोल-ताशा पथक व इतर वाद्ये वाजविण्यास परवानगी दिली. गतवर्षीचा अनुभव लक्षात घेऊन साऊंड सिस्टीम असलेली वाहने मूर्तीजवळ पोहोचू दिली नाहीत.

मोठ्या प्रमाणात मूर्ती पासून लांब कानाला कानठळ्या बसणाऱ्या आवाजात डीजे सुरू होता. सोबत डोळ्याला घातक असणारे लेझर देखील सर्रासपणे वापरण्यात येत होते. या सर्वांवर तरुणाई बेधुंद होऊन थिरकत होती. परिणामी शहरातील वाहतूक व्यवस्था खोळंबली. शहरातून गांधीनगर, शिरोली पुलाकडे जाणाऱ्या वाहनांमुळे, तसेच शहरात येणाऱ्या वाहनांमुळे सांगली फाटा, उजळाईवाडी, शिवाजी विद्यापीठ मार्गापर्यंत वाहतुकीत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या तर महामार्गावरही अनेक जण आगमन सोहळा पाहण्यासाठी थांबल्याने येथील वाहतूकही विस्कळीत झाली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.