Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भाजपतर्फे राज्यभर ‘हर घर तिरंगा’ अभियान, एक कोटी घरांवर तिरंगा लावण्याचा संकल्प

12

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ मध्ये हर घर तिरंगा अभियान साजरे करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार भाजपच्यावतीने राज्यभरात ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान मोठ्या उत्साहात साजरे करणार असल्याची माहिती या अभियानाच्या प्रदेश संयोजक आ. उमा खापरे यांनी सोमवारी दिली.

भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी खापरे यांनी सांगितले की,भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या अभियानातील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत एक कोटी लोकांपर्यंत पोहोचून त्यांना त्यांच्या घरावर तिरंगा लावण्यासाठी प्रेरित करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. राज्यभर लोकसहभागातून तिरंगा यात्रा, घरोघरी तिरंगा फडकवणे, महापुरुषांच्या स्मारक, पुतळ्यांची स्वच्छता, फाळणी विभीषिका स्मृतिदिन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असणार आहे, असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्य दिनाच्या या उत्सवात सामान्य माणसाने अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे या हेतूने हे अभियान आयोजित केले असल्याचे त्या म्हणाल्या.
Majhi Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहिण’साठी सव्वा कोटी अर्ज, फडणवीसांनी सांगितलेली मतांची तफावत; योजना ठरणार गेमचेंजर?

ठाणे, कोकण, मुंबईत राणी निघोट-द्विवेदी, मराठवाड्यात किरण पाटील, उ.महाराष्ट्रात अजय भोळे, तर पश्चिम महाराष्ट्रात सुदर्शन पाटसकर हे या अभियानाचे सहसंयोजक असतील. ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून ते स्वातंत्र्य दिनापर्यंत प्रत्येक घर, दुकान व कार्यालयावर राष्ट्रध्वज लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक लोकसहभागासाठी बूथ स्तरापर्यंतचे कार्यकर्ते जनजागृतीवर भर देणार आहेत. शाळा,महाविद्यालयांशी संपर्क साधून ध्वजारोहणासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. ११ ते १४ ऑगस्ट या काळात पक्ष संघटनेच्या प्रत्येक मंडलात तिरंगा यात्रा होणार आहेत. या यात्रेमध्ये युवा मोर्चा, महिला मोर्चा, अनु.जाती व जमाती मोर्चा तसेच मंडलातील विविध स्थानिक सामाजिक संघटनांचा सहभाग असणार आहे. यात्रेचा समारोप हा विधानसभा स्तरावर होणार आहे.
BJP President: तुम्ही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार का? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात पाहा काय उत्तर दिले

फडणवीस साधणार महिला भक्तांशी संवाद, चार कोटी महिलांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रावणाच्या महिन्यात एक अनोखे अभियान हाती घेतले आहे. श्रावणातील सोमवारी भाविक मोठ्या संख्येने शिव मंदिरांमध्ये जातात. त्यात महिलांचे प्रमाण लक्षणीय असते. हीच बाब लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री फडणवीस श्रावणातील दर सोमवारी शिव मंदिरांमध्ये ‘मेरा वचन, मेरा शासन’च्या बॅनरखाली एक नवे आश्वासन देणार आहेत. या माध्यमातून राज्यातील जवळपास चार कोटी महिलांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न असून या अभियानातून भाजप महिलांशी थेट संवाद साधेल.

भाजपने राज्यातील महिला मतदारांना नेहमीच अग्रक्रम दिल्याचे दिसते. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट देताना महिलांना प्राधान्य दिले हाते. भाजपचे १०५ उमेदवार विजयी झाले, त्यात १२ महिला आमदारांचा समावेश होता. उज्ज्वला योजना, लखपती दिदी, मुद्रा योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने महिला मतदारांकडे विशेष लक्ष दिले आहे. आता राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती महिला मतदारांना साद घालत आहे. ही योजना मध्य प्रदेशात भाजप सरकारने सर्वप्रथम राबवली. योजनेचा फायदा भाजपला विधानसभा निवडणुकीसह लोकसभेलादेखील झाला. त्यामुळेच हीच योजना आता महाराष्ट्रात राबवली जात आहे. त्यात आता देवेंद्र फडणवीसांनी श्रावण महिन्यातील रणनीती आखली असून या योजनेच्या माध्यमातून महिलांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.