Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘जायकवाडी’कडे चालला प्रवाहो…
– नांदूरमध्यमेश्वर धरणातून ५४,२३३ क्युसेक विसर्ग
– गंगापूर धरणातून ८,००० क्युसेक विसर्ग
– निळवंडे धरणातून २१,८५५ क्युसेक विसर्ग
नाशिककरांना दिलासा…
– गंगापूर धरणाचा जलसाठा ८१ टक्क्यांवर
– हंगामात प्रथमच गंगापूर धरणातून विसर्ग
– रविवारी रात्री आठला तब्बल आठ हजार क्युसेक विसर्ग
अतिवृष्टीमुळे आठ जणांचा मृत्यू
मुंबई/नाशिक : नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दोन जण वाहून गेले, तर जळगाव जिल्ह्यातील भोकरबारी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू झाला. अन्यत्र तिघांचा मृत्यू झाल्याने राज्यात गेल्या चोवीस तासांत आठ जणांचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यभरात आतापर्यंत एकूण ११० जणांचा मृत्यू झाला असून, १६३ जण जखमी तर सहा जण बेपत्ता असल्याची माहिती राज्य ‘आपत्ती परिस्थिती अहवाला’तून समोर आली आहे.
कुठे काय घडले?
– मालेगावात गिरणा नदीपात्रात काही मच्छीमार अडकले असून, प्रवाह अधिक असल्याने मदतीत अडथळा येत असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दिली.
– कालसर्पची पूजा करण्यासाठी आलेला तरुण गोदावरीच्या पुरात वाहून गेला, तर सुरगाण्यातही एक महिला वाहून गेली