Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Nagpur News: आधी प्रेयसीला व्हिडिओ कॉल, नंतर बोलता बोलता आयुष्य संपवले; पोलिसांकडून मोबाईल जप्त

12

नागपूर (जितेंद्र खापरे) : जिल्ह्यातील कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादुला येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिथे एका तरुणाने आधी आपल्या प्रेयसीला व्हिडिओ कॉल केला आणि नंतर तिच्यासमोर गळफास घेऊन आत्महत्या केली. पलाश सोनारे (२२) असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पालाशचे एक तरुणीवर प्रेम होते आणि त्याला त्या तरुणीसोबत लग्न करायचे होते. संबंधित तरुणी मात्र लग्नासाठी सतत नकार देत होती, त्यामुळे तरुणाने हे पाऊल उचलले असावे असे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

पलाशच्या कुटुंबात आई-वडील आणि एक लहान भाऊ आहे. पलाश हा व्यवसायाने फोटोग्राफर होता. पालाश अनेक दिवसांपासून तणावात होता. त्याच दरम्यान घटनेचा दिवशी पलाशचे काही कारणांवरून त्याचा मित्रांशी भांडणही झाले होते. गळफास लावण्या पूर्वी त्याने आपल्या मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला होता. असे सांगितले जात आहे की , त्याचे मुलीवर प्रेम होते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. परंतु लग्नासाठी वारंवार विचरूनही मुलगी त्याच्याशी लग्न करण्यास नकार देत होती.
India vs Germany Hockey: हॉकीमध्ये जर्मनीविरुद्ध आहे अशी भारताची दहशत; गेल्या ५ लढतीत निकाल सांगतोय आजच्या सेमीफायनलचा विजेता

पालाशने मुलीला लग्नाबाबत विचारले पण तिने नकार दिल्याने त्याने गळफास लावून घेतला. मात्र, दुसऱ्या बाजूला त्याची मैत्रीण हा सर्व प्रकार व्हिडिओ कॉल वर पाहत होती. दरम्यान हा सर्व प्रकार सुरू असताना पालशचा भाऊ त्याचा खोली बाहेर गेला असता, त्याला काहीतरी विपरीत घडत असल्याचे आवाज ऐकू आला. त्यानंतर त्याचा लहान भावाने दरवाजा ठोठावला असता, दार आतून बंद होत आणि आतमधून कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याने त्याने दार तोडून खोलीच्या आतमध्ये शिरला असता पालशचा मृतदेह पंख्याला लटकलेला अवस्थेत दिसला.
Paris Olympics Day 11 Schedule: पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतासाठीचा बहुप्रतिक्षीत दिवस; नीरज चोप्रा भाला फेकणार, हॉक संघाची सेमीफायनल; असे आहे संपूर्ण वेळापत्रक

त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले होते. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी पलाशचा मोबाईल जप्त केला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास करत आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.