Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

School Holidays In Solapur: सोलापुरात बुधवार ७ ऑगस्ट रोजी सर्व शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, पाऊस नव्हे तर हे आहे कारण…

12

सोलापूर (इरफान शेख): महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षणाची दाहकता वाढली आहे. मनोज जरांगे पाटील यांची पश्चिम महाराष्ट्रातील शांतता रॅलीची सुरुवात सोलापुरातुन होत आहे. बुधवारी 7 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील सोलापुरात येणार आहेत आणि भव्य शांतता रॅलीला संबोधित करणार आहेत, त्यानिमित्त सोलापुरात मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र शासनाने काढलेल्या सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सोलापूर शहरातून शांतता रॅली काढली जाणार आहे. शांतता रॅली पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुटी जाहीर केली आहे.

लाखोंचा जनसमुदाय जमा होणार; गैरसोय नको त्यामुळे सुट्टीचा आदेश जाहीर

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान लाखो मराठा बांधव एकत्रित जमा होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतता रॅली काढून सभा होणार आहे. सरस्वती चौकमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जरांगे पाटील अभिवादन करायला जाणार आहेत. संभाजी महाराज चौका पासून ते आंबेडकर चौक या मार्गावर मराठा समाज बांधवांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे.
Battles Of Begums In Bangladesh: दोन बेगमांच्या भांडणात बांगलादेशची वाट लागली; शेख हसीना आणि खालिदा झिया मैत्री ते कट्टर शत्रू असा आहे रक्तरंजीत इतिहास

रॅली कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाऱ्या वाहनांचा अडथळा निर्माण होवून वाहतुकीची कोंडी होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. ७ ऑगस्टला सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत मराठा आरक्षण शांतता रॅलसंबंधाने छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा मार्ग सर्वच वाहनांसाठी बंद ठेवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हादंडाधिकारी मनिषा कुंभार यांनी शहरातील शाळांच्या सुटीचा आदेश काढला आहे.
Nagpur News: आधी प्रेयसीला व्हिडिओ कॉल, नंतर बोलता बोलता आयुष्य संपवले; पोलिसांकडून मोबाईल जप्त

लाखो मराठा बांधव जमा होतील; ठळक बाबी

शांतता रॅलीसाठी सोलापूर शहर-जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर लोक येण्याची शक्यता आहे. सोलापूर शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना अडचणी येवू शकतात. शहरातील सरकारी, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये व व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रांना 7 ऑगस्ट रोजी सुटी राहील.विद्यार्थ्यांना शाळेला सुटी असेल, पण शाळा, संस्थांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून काम करायचे आहे, असेही आदेशात नमूद आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.