Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
बबनराव लोणीकर आणि रावसाहेब दानवे वाद पुन्हा चर्चेत
जालना हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे यांचे जिल्हा म्हणून ओळखला जातो. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे छत्रपती संभाजी नगर आणि जालना जिल्ह्यामध्ये वर्चस्व होते. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे खांदे समर्थक म्हणून रावसाहेब पाटील दानवे कडे पाहिले जायचे. रावसाहेब पाटील दानवे हे भोकरदन तालुक्याचे आमदार म्हणून त्यांनी १० वर्ष काम केले त्यानं नंतर त्यांना प्रथम १९९९ जालना जिल्ह्यातून लोकसभा लढली व ते पंचवीस वर्षापासून जालना लोकसभेचे खासदार म्हणून निवडून येत होते पण यंदा मात्र पराजय दानवेंच्या पदरी पडला.
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर राज्यांमध्ये मराठवाड्यामध्ये सर्वात मोठा चेहरा म्हणून रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे पाहिले जायचे.
त्यांचा कडे महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष पद देखील आले होते. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे विश्वासू एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून बबनराव लोणीकर यांचा कडे पहिले जाते. यांनी देखील राज्यांमध्ये पाणीपुरवठा मंत्री म्हणून पदभार सांभाळला आहे. गेले पंचवीस वर्षापासून बबनराव लोणीकर हे देखील मंठा आणि परतूर मतदार संघाचे आमदार म्हणून निवडून येत आहेत, बबनराव लोणीकर जालना शहराचे पालकमंत्री असताना शहर आणि बाकीच्या तालुक्याकडे जास्त लक्ष देत नव्हते मात्र मंठा आणि परतुर या जिल्ह्याकडे जास्त त्यांच्या लक्ष होत, असे आरोप देखील रावसाहेब पाटील दानवे गटाकडून त्यांच्यावरती केल्या जायचे त्यामुळे त्यांच्यावरती प्रचंड नाराजी होती असे देखील बोलले जाते.
बबनराव लोणीकर व रावसाहेब पाटील दानवे यांचे मागील पंधरा वर्षांपूर्वीचे राजकीय वैर आहे अशी देखील चर्चा जालना शहरांमध्ये समोर येत आहे. हे दोघेही नेते कधीही एका मंचावर येत नाही जर आले तरी देखील एकमेकांच्या चेहरा देखील पाहत नाहीत एवढे प्रचंड वैर दोघांमध्ये आहे. रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली जर एखादी सभा असेल, रॅली असेल, मिरवणूक असेल, बैठक असेल तर त्या बैठकीला चुकून ही बबनराव लोणीकर यांना निमंत्रण नसते किंवा ते बैठकीला देखील येत नाहीत, दुसरीकडे पाहिलं तर बबनराव लोणीकर यांनी जर कार्यक्रम घेतला तर त्यांच्या कार्यक्रमांमध्ये देखील रावसाहेब दानवे हे कधीच उपस्थित राहिलेले नाही आणि त्यांना देखील निमंत्रण असल्यास तरी येत नसते यामुळे मात्र ह्या दोघांचे राजकीय वैरयांची चर्चा मात्र जालना शहरांमध्ये नाही तर मराठवाड्याला माहिती आहे.