Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शेतकरी नेहमीप्रमाणे आपली बैलगाडी शेतात घेऊन जात असताना चिखलाने मात्र शेतकऱ्याची वाड अडवली. यामध्ये त्याच्या बैलगाडीचं एक चाक चिखलात रुतलं आणि नंतर गाडीचा तोल गेल्याने बैलाचाही तोल गेला आणि बैल त्या गुडघाभर चिखलात अडकला. हा बैल तब्बल सहा तास चिखलात अडकून होता. शेतकऱ्यांनी प्रयत्नांची शिकस्त करुन दोरीने कसेबसे बैलाला बाहेर काढले. आणखी काही वेळी बैल चिखलातच अडकला असता तर तो गतप्राण होण्याची देखील शक्यता होती.
पावसाळ्याच्या चार महिन्यांत रस्त्यांची दुरावस्था होत असते. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. काहीवेळी तर ही बाब जीवाशी येते. यामुळे रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
शेतकरी म्हणतात…
विरदेल ते अक्कडसे या रस्त्याचे अद्याप डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे पावसाळ्याचे चारही महिने हा रस्त्यावर गुडघाभर चिखल पसरलेला असतो. बैलगाडीशिवाय या रस्त्यावरुन कोणतेही वाहन जाऊ शकतं. मात्र, या रस्त्यावरुन बैलगाडी घेऊन जाणे आता जिकीरीचे झाले आहे. त्यामुळे तो वरकरणी लक्षात येत नाही. परिणामी, या रस्त्यावरुन जाणारी बैलगाडी खड्ड्यांमध्ये हमखास फसतेच. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या मदतीने ती चिखलातून काढून मार्गी लावावी लागते, हा जणू दररोजचा परिपाठच झाला आहे. या रस्त्यामुळे मुक्या जनावरांचे प्रचंड हाल होत आहेत. आजवर अनेकांनी या रस्त्याचे भूमिपूजन केले, परंतु रस्त्याचे काम अद्याप मार्गी लागलेले नाही. त्यामुळे शेतकरी वर्गातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.