Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण बाखडे यांचे इतवारीतील खापरीपुरा परिसरात रेणुका नॉव्हेल्टी नावाचे दुकान आहे. तेथील दुकानाच्यावर ते कुटुंबासह राहतात. बुधवारी पहाटे संपूर्ण कुटुंब झोपलेले असताना तळमजल्यावरील गोडाऊनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. काही वेळातच आगीने संपूर्ण इमारतीला वेढले. यावेळी कुटुंबातील एक सदस्य जागा झाला. आग पाहून एकच आरडाओरडा झाला. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक बाहेर आले. त्यानंतर तातडीने ही माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी आठ गाड्यांसह घटनास्थळी पोहोचले. गोडाऊनमध्ये अत्तर आणि चप्पल ठेवण्यात आली होती. प्लॅस्टिकच्या वस्तू असल्याने आग विझवण्यात आणि आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात मोठी अडचण आली. त्याही परिस्थितीत अग्निशमनदल घराच्या आत पोहोचले. आत अडकलेल्या चार जणांना बाहेर काढण्यात आले.
यापूर्वी १० ऑक्टोबर २०२३ मध्ये नागपूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या इतवारी परिसरात लोहाओळींमध्ये फकदुद्दीन हसरअली आणि ब्रदर्स यांच्या रंगाच्या दुकानाला पहाटेच्या सुमारास आग लागल्याने यात कोट्यवधींचे नुकसान झाले होते. अग्निशमन विभागाच्या घटनास्थळी सात गाड्या पोहोचल्यानंतर आग नियंत्रणात आणल्याने मोठी घटना टळली होती.