Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मनपाची आणखी एक सुविधा, गणेश विसर्जनाच्या तलावांची यादी आता गुगल मॅपवर

6

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली असून विविध उपक्रम राबवत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून गणपती मूर्तिकारांना शाडूची माती पुरविणे, काही ठिकाणी जागा उपलब्ध करून देणे, मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करणे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने गणेश गौरव स्पर्धेचे आयोजन करणे यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. याशिवाय, मुंबईकरांना त्यांच्या घराजवळील कृत्रिम तलावांची माहिती सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने तलावांची यादी गुगल मॅपवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी विविध मुद्यांवर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, मुंबई पोलिस अधिकारी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यासाठी महापालिकेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
Har Ghar Tiranga: भाजपतर्फे राज्यभर ‘हर घर तिरंगा’; एक कोटी घरांवर राष्ट्रध्वज लावण्याचा संकल्प
यंदा ऑनलाइन खरेदी माध्यमांशी संपर्क साधून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घरपोच वितरण करण्याची सुविधा पुरविण्याकरिता समन्वय साधण्यात येणार आहे. तसेच गुगल मॅपवर कृत्रिम तलावांची यादी देण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यासाठी मुंबईतील सर्व कृत्रिम तलावांची माहिती सहज उपलब्ध होईल. याद्वारे घराजवळ असलेल्या कृत्रिम तलावाचीही माहिती मिळेल. यंदा कृत्रिम तलावांची संख्या दोनशेपेक्षा अधिक वाढवण्याचे लक्ष्य निश्चित केल्याचे परिमंडळ २चे उपायुक्त आणि गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी दिली.

एक खिडकी योजना सुरू

राज्य शासनाच्या निर्णयानुसार गेली दहा वर्षे नियमांचे पालन करणाऱ्या सार्वजनिक गणेशेत्स मंडळांना यंदाच्या गणेशोत्सवापासून सलग पाच वर्षांकरिता विभाग कार्यालयामार्फत एकदाच परवानगी देण्यात येणार आहे. याकरिता मागील दहा वर्षांत सर्व नियम, कायदे यांचे पालन केले आहे आणि आपल्याविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे स्वयंघोषणापत्र देणे सार्वजनिक अथवा खासगी जागेवर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांसाठी आवश्यक असणार आहे. या परवानगीचे दरवर्षी नूतनीकरण करणे गरजेचे असेल. ६ ऑगस्ट २०२४ पासून एक खिडकी योजनेनुसार संगणकीय प्रणालीद्वारे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी ऑनलाइन परवानगी देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची महापालिकेकडून सांगण्यात आले.
Mumbai Local: मुंबईकरांची ‘लोकल’ प्रतीक्षा कायम, परळ-कुर्ला दरम्यानची पाचव्या-सहावी मार्गिका ३ वर्षांनंतर, मध्य रेल्वेची माहिती

क्यूआर कोडवरही मिळणार माहिती

क्यू आर कोडद्वारेही गणेशभक्तांना कृत्रिम तलावांची माहिती मिळणार आहे. हा क्यू आर कोड गणेश मूर्तिकारांच्या मंडपाबाहेर दर्शनीय भागात लावण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक होण्यासाठी मदत मिळणार आहे.

फिरत्या शौचालयांची संख्या वाढणार

विसर्जनाच्या दिवशी गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम चौपाटी येथे फिरत्या शौचालयांची संख्या वाढविण्यात यावी, अशी सूचना मंगळवारच्या बैठकीत घेण्यात आली. त्यानुसार विसर्जनाच्या दिवशी फिरत्या शौचालयांची संख्या वाढवण्याचे निर्देश पालकमंत्री लोढा यांनी दिले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.