Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Chitra Wagh: परिस्थितीनुरुप तुमची भूमिका बदलली! चित्रा वाघ यांच्याबाबत हायकोर्टही आश्चर्यचकित, काय प्रकरण?

10

मुंबई : ‘परिस्थितीत बदल झाला की असे होते. बदललेल्या परिस्थितीत तुमची भूमिकाही बदलते. न्यायालयात जनहित याचिकांच्या माध्यमातून असा खेळ खेळला जातो आणि न्यायालयांना अशात गुंतवले जाते. हे अत्यंत चुकीचे व खेदजनक आहे’, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या बदललेल्या भूमिकेबाबत आश्चर्यवजा नाराजी व्यक्त केली.

काय आहे प्रकरण?


पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाबाबत तत्कालीन वनमंत्री व विद्यमान मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशा विनंतीची फौजदारी जनहित याचिका चित्रा वाघ यांनी सन २०२१मध्ये केली. ही याचिका बुधवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणीस आली. तेव्हा, संबंधित घटनेबाबत कोणती चौकशी केली? आणि हस्तगत करण्यात आलेल्या मोबाइलमधील आवाजाबाबत कोणती तपासणी केली? अशी विचारणा खंडपीठाने मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांच्याकडे केली. तेव्हा, ‘पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या घटनेच्या वेळी संजय राठोड हे नागपूरमध्ये होते, असे तपासात समोर आले आहे. तसेच तपास संस्थेने राठोड यांच्या आवाजाचे नमुने घेऊन न्यायसहायक प्रयोगशाळेत पाठवले होते. त्या तपासणीत असे आढळले की कथित संभाषणातील आवाजाशी साधर्म्य आहे, परंतु तो आवाज राठोड यांचा नाही’, अशी माहिती वेणेगावकर यांनी दिली. त्यानंतर ‘भविष्यात आवश्यकता भासल्यास योग्य त्या न्यायालयीन मंचासमोर जाण्याची मुभा देऊन हवे तर न्यायालयाने ही याचिका निकाली काढावी’, अशी विनंती वाघ यांच्यातर्फे अॅड. प्रल्हाद परांजपे यांनी केली.
Vinesh Phogat Disqualification: विनेश फोगाटच्या अपात्रतेवर बृजभूषण सिंहांच्या मुलाची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘देशाचे सर्वात मोठे नुकसान’
मात्र, ‘आम्ही याचिका निकाली काढल्याचा आदेश का करावा? तुमची आताची भूमिका काय आहे?’, अशी विचारणा मुख्य न्यायमूर्तींनी केली. तेव्हा, ‘याचिका मागे घेण्याबाबत याचिकाकर्त्यांशी सल्लामसलत करून सांगू’, असे परांजपे यांनी स्पष्ट केले. त्यावेळी ‘परिस्थितीत बदल झाला की असे होते. बदललेल्या परिस्थितीत तुमची भूमिकाही बदलते. जनहित याचिकांच्या माध्यमातून असा खेळ खेळला जातो आणि न्यायालयांना अशात गुंतवले जाते. हे अत्यंत चुकीचे व खेदजनक आहे’, अशी नाराजी मुख्य न्यायमूर्तींनी व्यक्त केली. अखेरीस दुपारच्या सत्रात वाघ यांच्यातर्फे भूमिका स्पष्ट परांजपे यांनी खंडपीठाला सांगितले की, ‘याचिका मागे घेण्याबाबत याचिकाकर्तीकडून मला सूचना नसून तारीख द्यावी. त्याप्रमाणे त्या तारखेला आम्ही युक्तिवाद मांडू’.

टिक टॉक अॅपच्या माध्यमातून लोकप्रिय झालेली तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येसाठी तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड हे कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी भाजपच्या महिला आघाडीने तीव्र आंदोलनही उभारले. त्या घटनेनंतर संजय राठोड व अरुण राठोड यांच्या पूजासोबतच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप समोर आल्या आणि अनेक फोटो समोर आले. त्याच पार्श्वभूमीवर, चित्रा वाघ यांनी ही याचिका केली होती.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.