Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आठ वर्षांनी पोटी लेक आली, मात्र नियतीने हिरावली, पाचव्या मजल्यावरुन कुत्रा पडून चिमुकली ठार

11

ठाणे : आईसोबत चालत जात असलेल्या पाच वर्षांच्या मुलीच्या अंगावर एका इमारतीच्या गच्चीवरून कुत्रा पडला. या घटनेत मुलीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी मुंब्रा शहरातील अमृतनगर परिसरात घडली.

मुंब्रा येथील अमृतनगर भागातील दर्गा रोडवरुन मंगळवारी दुपारी सना शेख ही आईसोबत बाजारात निघाली होती. त्यावेळी एका पाच मजली इमारतीच्या गच्चीवरून लॅब्रेडोर जातीचा पाळीव कुत्रा सनाच्या अंगावर पडला. चिराग मॅन्शनमधील सीसीटीव्ही कॅमेरात या घटनेचा व्हिडिओ कैद झाला आहे. या घटनेमध्ये गंभीर जखमी झाल्याने सनाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

आठ वर्षांनी पोटी मूल

सना ही केटरर पित्याची एकुलती एक मुलगी होती. आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर खान दाम्पत्याच्या पोटी तिचा जन्म झाला होता, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. सनाचे मामा आसिफ रंगरेझ यांनी सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास मायलेकी चिराग मॅन्शन ए-विंगमधून जवळच्या दुकानात डायपरचे पॅकेट बदलण्यासाठी गेल्या होत्या. त्या बाहेर पडल्या, तेव्हा कुत्रा बी-विंगच्या टेरेसवरून चिमुकलीवर पडला आणि गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला.
Body in Suitcase : दादरला सूटकेसमध्ये डेडबॉडी, मूकबधीर अ‍ॅनिमेटरकडून हत्येचं शूटिंग, मित्रांना व्हिडिओ कॉल केल्याचंही समोर
सनाला प्रथम खासगी रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर सीटी स्कॅनसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी ईसीजी करून तिला मृत घोषित केले.
Sangli Girl Attack : चार महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, १९ वर्षीय विद्यार्थिनीवर भररस्त्यात नवऱ्याकडूनच चाकूहल्ला
‘हा कुत्रा पाळणाऱ्याने ठाणे महापालिकेची परवानगी घेतली होती का, याबाबत चौकशी करण्यात येत आहे’, अशी माहिती मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली. या प्रकरणात मुलीच्या आईचा जबाब नोंदवण्यात आला असून, त्यांची कोणाविरुद्ध तक्रार नाही. त्यांनी कुणावरही संशय व्यक्त केला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

इमारतीवरून पडलेला कुत्राही जखमी झाला आहे. त्याच्यावरही प्राण्यांच्या दवाखान्यात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, हा कुत्रा इमारतीवरून पडला, की त्याला फेकण्यात आले, असा प्रश्न प्राणीमित्रांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.