Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

काम झालं का? अर्शदचा जीव घेतल्यानंतर जयला फोन, महिला रडारवर, बेल्जियमचा व्हिडिओ कॉलही तपासणार

11

मुंबई : ३० वर्षीय मूकबधीर तरुणाच्या हत्येच्या कटात एका महिलेचाही सहभाग असल्याचा संशय पायधुनी पोलिसांना आहे. हत्येच्या वेळी एका महिलेने दोघा आरोपींपैकी एकाला फोन करुन ‘काम झालं की नाही?’ असा प्रश्न विचारला असता, आरोपीने तरुणाची हत्या झाल्याचं तिला कळवलं होतं. संबंधित महिला आणि आरोपी जय चावडा या दोघांचे प्रेमसंबंध असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. हे हत्येच्या कारणांपैकी एक असू शकते.

रेल्वे पोलिसांनी रविवारी मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर तुतारी एक्स्प्रेसमध्ये जड सुटकेससह चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या २९ वर्षीय जय चावडा याला अटक केली होती. बॅगेतून रक्त सांडत असल्याने पोलिसांनी संशय आला. बॅग उघडल्यावर पोलिसांना त्यात एका व्यक्तीचा विवस्त्र मृतदेह आढळला होता. त्याची ओळख नंतर सांताक्रूझ रहिवासी असलेला अर्शद शेख म्हणून झाली. विशेष म्हणजे मृतदेहासह सापडलेला आरोपी मूकबधीर असल्याने पोलिसांना अडचणी येत होत्या. मात्र मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जात असल्याचे चावडाने पोलिसांना सांगितले होते.

अर्शद शेखच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी जय चावडा आणि त्याचा २८ वर्षीय मूकबधीर मित्र शिवजित सिंग यांना अटक करण्यात आली. मयत अर्शद आणि आरोपी जय-शिवजीत हे तिघेही मित्र होते.

Mumbra Dog falls on Girl : आठ वर्षांनी पोटी लेक आली, मात्र नियतीने हिरावली, पाचव्या मजल्यावरुन कुत्रा अंगावर पडून चिमुकलीचा मृत्यू
शिवजीत सिंग अर्शद शेखवर हातोड्याने वार करत असताना, जय चावडाने बेल्जियम पासपोर्टधारक एका व्यक्तीला व्हिडिओ कॉल केला होता. “परदेशी पासपोर्ट असणारी व्यक्ती मूळ भारतीय आहे. हत्येमध्ये त्याची काही भूमिका होती का, याबद्दल आम्ही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
Dadar Station Suitcase news : माझाही मुलगा मूकबधीर, हवालदार मामा पुढे आले, सुटकेसमधील बॉडीचं गूढ उकलण्यात महत्त्वाचा दुवा
अर्शद शेखला जीवे ठार मारण्यासाठी सुपारी म्हणून पैसे दिले होते का, याचाही तपास पोलीस करत आहेत. जय चावडाची आई आणि भाऊ कॅनडात राहतात, तर तो पायधुनीजवळील गुलालवाडी परिसरात राहतो. अर्शद शेख आणि त्याची पत्नी हे दोघेही मूकबधिर असून त्यांना १२ आणि चार वर्षांच्या दोन मुली आहेत. शेख एका कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून काम करत होता.

उल्हासनगरमध्ये राहणारा शिवजीत सिंग दिव्यांग व्यक्तींच्या संघात क्रिकेट खेळतो. सहा महिन्यांपूर्वी अर्शद शेखने जय चावडा याला काही कारणावरून मारहाण केली होती आणि त्याचा व्हिडिओ शूट केला होता. म्हणून पोलीस सूडाच्या संभाव्य कारणाचाही तपास करत आहेत.

रविवारी जयने अर्शद आणि शिवजीत यांना त्याच्या पायधुनी येथील निवासस्थानी जेवायला बोलावले होते. तेथे तिघांनी मद्यपान करून वाद घातला. त्यानंतर दोन्ही आरोपींनी अर्शदवर हातोडा आणि धारदार वस्तूने वार करुन त्याचा जीव घेतला होता.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.