Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पत्नीसह मित्रांकडून छळ अन् ब्लॅकमेलिंग, हताश पतीचं टोकाचं पाऊल, चिठ्ठीत संतापजनक माहिती

7

डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील भगवान काठेनगरमध्ये राहणाऱ्या ४२ वर्षीय इसमाने गळफास लावून आत्महत्या केली होती. आठ महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी मंगळवारी सदर इसमाच्या पत्नीसह तिच्या मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पत्नीने मित्रांच्या मदतीने छळ करून, त्याला मानसिक, शारीरिकदृष्ट्या त्रास देऊन त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघडकीस आले आहे. मृत इसमाच्या भावाने संशय व्यक्त करून तशी फिर्याद दाखल केली होती.

सुधाकर यादव (४२) असे मयत पतीचे नाव आहे. तर संजना यादव (३१) आरोपी पत्नीचे नाव आहे. संजनाने महम्मद शेख, महेश पाटील आणि एक अनोळखी इसमाच्या सहकार्याने पतीचा मानसिक छळ केला. त्याला विविध प्रकारे त्रास देऊन त्याचं जगणं कठीण केलं. पत्नीसह तिच्या मित्रांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून २० डिसेंबर २०२३ रोजी सुधाकर यादव यांनी घरात एकटे असताना गळफास घेत आत्महत्या केली.
Crime News: माझ्याशी बोल, मला भेट, नाही तर मी डीपीवर चढेन! तरुणी धमक्यांना कंटाळली अन् नको ते घडलं
सुधाकरचा बदलापूर येथे राहणारा भाऊ प्रभाकर यशवंत यादव (४४) याने भावाच्या आत्महत्येप्रकरणी संशय व्यक्त करून पोलिस ठाण्यात २२ मे २०२४ ला तक्रार अर्ज दिला होता. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली. या चौकशीत सुधाकरला त्याची पत्नी संजना आणि आरोपी मित्र हे खूप त्रास देत असल्याचं पुढे आलं. या त्रासाला कंटाळून सुधाकर यादवने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं.

भावाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून त्यामध्ये त्याच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या व्यक्तींची नावे नमूद केली होती. ही चिठ्ठी पोलिसांनी घटनास्थळाजवळून जप्त केली. भावाचे फेसबुक अकाउंट हॅक झाले होते. भावाला काही लोक फोनवर त्याने फेसबुकवर वैयक्तिक केलेले चॅटींग व्हॉयरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत होते. चॅटींग केलेले पुरावे आमच्या जवळ आहेत, ते व्हॉयरल न करण्यासाठी हे लोक पैशांची मागणी करत होते.

त्यानंतर भावाने घाबरून त्याच्या बायकोच्या अकाउंटमधून ऑनलाईनद्वारे महम्मद शेख याला ५ हजार, महेश पाटील याला ५ हजार रूपये ट्रान्सफर केले. त्यानंतर सुधाकर याला त्याची पत्नी संजनाने महम्मद शेख याला २० हजार रूपये दिले. त्या मोबल्यात महम्मद शेख याच्याजवळ असलेले सुधाकरचे पर्सनल चॅटींग आणि व्हिडीओ मागवून घेतले. यावरून संजना आणि तिच्या मित्रांनी सुधाकर याला ब्लॅकमेल करून त्याचा मानसिक छळ केला.

हा छळ असह्य झाल्यामुळेच आपल्या भावाने शेवटचे टोक गाठल्याचा आरोप प्रभाकर यादव यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे. स्वतःचे हस्ताक्षरात लिहुन ठेवलेल्या चिठ्ठीमधील अक्षर माझ्या भावाचेच असल्याचे सांगून आरोपींवर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. पोलिसांनी आठ महिने केलेल्या तपासानंतर पत्नी संजनासह तिच्या मित्रांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक गणेश देवरे प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.