Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आई-बाबांनी गरिबीतून इंजिनिअर घडवला, नियतीने हिरावला; एसटीवर धडकून २५ वर्षीय तरुणाचा अंत

9

सिंधुदुर्ग: बस आणि बाईक यांचा भीषण अपघात होऊन आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून समोर आली आहे. काल सकाळी दहा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या घटनेत आई वडिलांचा एकुलता एक मुलगा काळाने हिरावून नेला. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

गुरुवारी सकाळी एसटी बस आणि बाईक यांची समोरासमोर धडक बसून अपघात घडला. हा अपघात सरंबळ तलेकरवाडीच्या दरम्यान घडला आहे.या अपघातामध्ये कुडाळ तालुक्यातील सरंबळ या गावातील आयटी इंजिनियर शुभम विठ्ठल परब (वय २५ वर्ष) या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला

परब कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच गरिबीची आहे. परिस्थितीशी झुंज देत असताना एकुलता एक तरुण मुलगा गेल्याने कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शुभम यांचा स्वभाव हसरा होता. शुभमच्या जाण्याने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Girl Photo in Rickshaw : रिक्षाचालकाने भाचीचा फोटो लावला, प्रवासी म्हणाला ‘ही माझी मयत मुलगी’, तीन वर्षांनी गूढ उकललं
एसटी बस ही कुडाळ वरून सरंबळ गावाकडे जात असताना शुभम सरंबळहुन कुडाळच्या दिशने निघाला होता. त्याच मार्गावर एसटी बस अचानक आल्यामुळे शुभमचा मोटरसायकल वरील ताबा सुटला आणि थेट मोटरसायकल बसवर समोरासमोर जाऊन आदळली.

या धडकेत शुभम गंभीर जखमी झाला. त्याचबरोबर शुभम यांच्यासोबत असलेले सरंबळ येथील रमेश जानकर (वय ५० वर्ष) हे गंभीर जखमी झाले आहेत. शुभम गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान शुभम परब यांचा मृत्यू झाला, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली.

या अपघातामध्ये रमेश जानकर गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे. या अपघाताची माहितीच गावातील सर्व ग्रामस्थ जमा झालेत.
Dead Body in Suitcase : मध्यरात्री मुलाला कुठे उठवता? साहेब, मूकबधिरांची मर्डर केस आहे; कर्तव्यदक्ष सातपुतेंमुळे खुनाला ‘वाचा’

शुभम इंजिनियर होण्यामागचं आई वडिलांचं स्वप्न

शुभम परब यांच्या घरची आर्थिक परिस्थिती खूपच गरिबीची आहे. आई वडिलांनी दिवस रात्र मेहनत करत शुभमला इंजिनियरिंग शिक्षण दिले आणि ते त्यांनी पूर्ण देखील केले होते. अभ्यासामध्ये देखील तो खूप हुशार होता. इंजिनियरिंग होईपर्यंत प्रत्येक ठिकाणी टॉपर म्हणून ओळख होती. चित्रकला या क्षेत्रात त्याने नावलौकिक मिळवला आहे.

इंजिनियरिंग पूर्ण झाल्यानंतर मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करण्याचा मानस होता. परंतु शुभमचे यश काळाला बघवले नाही, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. शुभम परब यांच्या पश्चात आई- वडील आणि बहीण असा परिवार आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.