Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नीरज चोप्राचं सुवर्ण थोडक्यात हुकलं, दिल्लीच्या गादीसमोर कोण झुकलं? सकाळच्या दहा हेडलाईन्स

7

१. पुरुषांच्या भालाफेकीत भारताच्या नीरज चोप्राला रौप्य पदक, पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्ण पदक जिंकून ऑलिम्पिकमधील विक्रम रचला, तर नीरजही ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत दोन पदके जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू, नीरज चोप्राची दुसऱ्या प्रयत्नात सर्वाधिक ८९.४५ मीटर भालाफेक, तर अर्शद नदीमचा ९२.९७ मीटरसह इतिहास

२. फिटनेस आणि तंत्रात सुधारणा करण्यास वाव, थ्रो चांगला, पण आजच्या कामगिरीवर मी तितका आनंदी नाही, माझे तंत्र आणि धावपट्टी तितकीशी चांगली नव्हती, नीरज चोप्राची रौप्य पदकानंतर प्रतिक्रिया

३. देवेंद्र फडणवीस यांना शह, उद्धव ठाकरे आणि अजित पवारही अस्वस्थ, मात्र एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदावरील दावा भक्कम, पुस्तक प्रकाशनातून अनेकांचे कार्यक्रम? इथे क्लिक करुन वाचा सविस्तर

४. विधान परिषद निवडणुकीत ‘क्रॉस वोटिंग’ केल्याप्रकरणी आमदार हिरामण खोसकर यांची उमेदवारी धोक्यात, मुंबईत दोन दिवस तळ ठोकत गुनाना पटोले यांची भेट, बंद खोलीतील चर्चेत हिरामण खोसकर यांनी बाजू मांडली, तरी उमेदवारीबाबत ठोस आश्वासन नाही, खोसकर रिकाम्या हातानेच परतले

५. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भक्तांची मध्य रेल्वेकडून गुड न्यूज, सोयीसाठी ‘२२२ गणपती विशेष रेल्वे’ चालवण्याचा निर्णय, पुणे-रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडीच्या सहा फेऱ्या होणार, गाड्यांचे बुकिंग सात ऑगस्टपासून सुरु

६. मराठी नाटक, टीव्ही मालिका लेखकाचा म्हाडाच्या सोडतीत ‘कलाकार’ कोट्यातून अर्ज, घरही लागलं, मात्र पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले कलाकार प्रमाणपत्र मिळेना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे विनंती, परंतु लेखक कलाकार नसल्याचे धक्कादायक उत्तर, मराठी मनोरंजन सृष्टीत तीव्र नाराजी

७. प्रवासी बॅगेत लपवलेला मृतदेह दादर स्थानकात तुतारी एक्स्प्रेसमध्ये चढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला कर्तव्यदक्ष पोलिसांनी पकडलं, मूकबधीर आरोपीला बोलते करण्यात रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल राजेश सातपुते यांचा मूकबधीर मुलगा गौरव याची मदत, आरोपीने खुणांच्या भाषेत दिलेली उत्तरं गौरवने लिहून दिली, इथे क्लिक करुन वाचा संपूर्ण थरारक घटनाक्रम

८. एसटी बस आणि बाईक यांचा भीषण अपघात होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू, गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास अपघात, आई वडिलांचा एकुलता एक मुलगा काळाने हिरावला. कुडाळ तालुक्यातील सरंबळ गावावर शोककळा, गरीब कुटुंबाचा आधार हरपल्याने हळहळ

९. ठरलं तर मग मालिकेत प्रतिमाच्या खोट्या डेड बॉडीचं प्रकरण नागराज आणि खोट्या तन्वीच्या अंगाशी, रविराजकडून तपासाच्या हालचाली, पूर्णा आईंनी प्रतिमाला आवडीचं लोणचं-पोळी खाऊ घातलं, तर कॉफी पुराणावरुन सायली अर्जुन यांचे रुसवे फुगवे सुरुच, प्रिया दिसताच मिसेस सायलींचा जळफळाट

१०. देशांतर्गत शेअर बाजारात वरच्या पातळीवरून सध्या विक्रीचा कल, बाजारात नवीन गुंतवणूक करायची की नाही याबाबत लोकांमध्ये संभ्रम, भारतातील सध्या सुरू असलेला ‘बुल रन’ बाजार सुरूच राहील आणि आजपासून बाजारात १० वर्षे सुरू राहू शकेल, दिग्गज इन्व्हेस्टरचे स्पष्ट मत

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.