Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Ladki Bahin Yojana: पालघर जिल्ह्यातील ‘लाडक्या बहिणीं’चे ४२ हजार अर्ज रद्द; छाननी करताना आढळल्या त्रुटी

12

नरेंद्र पाटील, पालघर : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये पालघर जिल्ह्यातील बहिणींनी २ लाख ९६ हजार अर्ज दाखल केले असून, त्यापैकी ४२ हजार ४६७ अर्ज रद्द झाले आहेत. अर्जांची छाननी करताना त्यात अंशतः त्रुटी आढळून आल्यामुळे ते रद्द करण्यात आले आहेत. या त्रुटी ३१ऑगस्टपर्यंत दूर केल्यास संबंधित लाभार्थ्यांना मागील दोन महिन्यांचा लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच दुसरीकडे २ लाख ४५ हजार अर्ज मंजुरीच्या टप्प्यात असून, त्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे.

पालघर जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज वसई तालुक्यातून दाखल करण्यात आले आहेत. त्याखालोखाल पालघर तालुक्यातील असून सर्वात कमी अर्ज मोखाडा तालुक्यामधून आले आहेत. अर्जांतील त्रुटींमुळे रद्द झालेले सर्वाधिक अर्ज डहाणू तालुक्यातील आहेत. त्याखालोखाल वसई तालुक्यातील अर्ज रद्द करण्यात आले असून मोखाडा तालुक्यातून सर्वात कमी अर्ज रद्द झाले आहेत. सर्वात जास्त स्वीकारलेले अर्ज वसई तालुक्यातील आहेत. त्याखालोखाल पालघर तालुक्यातून व सर्वात कमी अर्ज मोखाडा तालुक्यातून मंजूर करण्यात आले आहेत.

४२ हजारांहून अधिक अर्जांमध्ये विविध प्रकारच्या तांत्रिक त्रुटी आढळल्याने ते अंशतः रद्द करण्यात आले आहेत. ज्या मोबाईलवरून हे अर्ज दाखल करण्यात आले आहेत त्याच मोबालचा तपशील देण्यात आला आहे. मोबाइलवरून त्रुटी दूर करणे शक्य होणार असल्याचे महिला बालविकास विभागाकडून यावर सांगण्यात आले. या योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांनी आवश्यक कागदपत्रे पुराव्यांसह ३१ ऑगस्टपर्यंत त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सूचित करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हास्तरावर येणाऱ्या अर्जांची पडताळणी सुरू असल्याने या योजनेसाठी नव्याने नोंदणी करण्याच्या संकेतस्थळावर मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे नव्या नोंदणी करण्याची प्रक्रिया काही काळ स्थगित ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना येत्या १५ ऑगस्ट रोजी योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्णत्वास आली असल्याचे सांगण्यात येत आहे,
रक्षाबंधनपूर्वीच बहि‍णींना मिळणार ओवाळणी! लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता ‘या’ तारखेला मिळणार
जिल्ह्यात एकूण अर्ज दाखल
तालुका/ एकूण प्राप्त अर्ज /स्वीकार / अंशतः रद्द

१) जव्हार / २२४२२/ १९४४६/ २९०६
२)मोखाडा/ १५३३७/ २५२७०/ ९९२
३) डहाणू/ ४७६४१/ ३१५९७/ २२३८४
४) पालघर/ ६२१४१/ ५३२९५/ ८४८९
५)तलासरी / २७१२०/ २४३०२/ २७९३
६) वसई/ ८९९८२/ ७४५६९/ १०९७५
७)विक्रमगड/ १८४०६/ १७०५४/ १०९७५
८) वाडा/ २२९५६/ २०२१०/ १३३९
एकूण / २९६००५/ २४४७४३/ ४२४६७

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.